JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Moving In With Malaika: फराहसोबत बोलताना ढसाढसा रडू लागली मलायका; नक्की काय झालं?

Moving In With Malaika: फराहसोबत बोलताना ढसाढसा रडू लागली मलायका; नक्की काय झालं?

आपल्या बोल्ड अंदाजामुळे सगळ्यांना घायाळ करणारी बॉलिवूड डिवा अभिनेत्री मलायका अरोरा सतत चर्चेत असते.

जाहिरात

मलायका अरोरा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 डिसेंबर : आपल्या बोल्ड अंदाजामुळे सगळ्यांना घायाळ करणारी बॉलिवूड डिवा अभिनेत्री मलायका अरोरा सतत चर्चेत असते. मलायका तिचा बोल्ड जीम लुक असो किंवा ग्लॅमरस अंदाज यामुळे कायमच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. सध्या मलायका तिचा आगामी शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’मुळे प्रचंड चर्चेत आहे. या शोचा एक प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये मलायकाचा भावुक क्षणही दिसून आला. मलायकाच्या शोबद्दल तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. यामध्ये ती केवळ तिच्या प्रोफेशनल लाईफचीच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही चर्चा करताना दिसणार आहे. ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोचा प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. काही क्षणातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पहायला मिळाला. व्हिडीओमध्ये मलायका म्हणतेय की जग जे काही म्हणते ते बकवास आहे. दुसरीकडे, करीना मलायकाची प्रशंसा करताना म्हणते, ती मजेदार, हॉट आणि सुंदर आहे. मलायका फराह खानशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलतानाही भावूक होताना दिसली.

संबंधित बातम्या

फराहसोबत बोलताना मलायका म्हणते ‘मी माझ्या आयुष्यात घेतलेले सर्व निर्णय योग्य होते.’  आणि तिला अश्रू अनावर होतात. त्यानंतर फराह मलायकाला म्हणते तू रडतानाही सुंदर दिसते. फराह खान मलायकाच्या शोची पहिली गेस्ट आहे. मलायका आणि फराह याही चांगल्या मैत्रिणी असल्याने निर्मात्यांनी तिला पाहुणे म्हणून संपर्क साधला. हा शो 5 डिसेंबरपासून OTT प्लॅटफॉर्मवर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे.

दरम्यान, मलायका तिच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत असते. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघेही कायम एकत्र स्पॉट होतात. बी-टाऊनमधील लोकप्रिय कपलपैकी मलायका आणि अर्जुन आहेत. दोघे कधी लग्न करणार? असा प्रश्न चाहते कायमच विचारतात. गेल्या काही दिवसांपूर्वी मलायका आई बनणार असल्याच्याही चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र यावर अर्जुनने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्याने पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षपणे या बातम्या फेटाळल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या