मुंबई, 14 मे : अभिनेत्री मलायका अरोराची (Malaika arora) जवळची व्यक्ती कोरोनाविरोधात (coronavirus) लढा देते आहे. तिनं त्या व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. ही व्यक्ती म्हणजे मलायची चुलत बहीण (cousin) आहे, जी एक कोरोना योद्धा आहे. मलायकाची चुलत बहीण हेल्थ केअर सेंटरमध्ये काम करते. कोरोना रुग्णांवर उपचारात ती महत्त्वाची भूमिका बचावत आहे. आपल्या सुरक्षेसाठी तिनं प्रोटेक्टिवर सूट आणि मास्क घातल्याचं दिसतं आहे. हा फोटो शेअर करत मलायकानं तिला सॅल्युट केलं आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो, तुला सॅल्युट आहे. असं कॅप्शन मलायकानं या फोटोखाली दिलं आहे. हे वाचा -
OMG! इंडियन Mr. Bean; तुम्ही हे व्हिडीओ पाहिलेत की नाही?
लॉकडाऊनमध्ये मलायका सध्या घरातील कामं करताना दिसत आहे, आपला छंद ती जोपासत आहे. विशेष म्हणजे मलायका घरात आता शेफ झाली आहे. ती स्वत: वेगवगळे पदार्थ बनवते आहे.
नुकतंच तिनं आपल्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला होता. ज्यात तिच्यासह तिचं आई, वडील आणि बहीण अमृता आहे. आपण त्यांन खूप मिस करत असल्याचं मलाकाका म्हणाली.
मलायका घरात आपला फिटनेसचीही काळजी घेते आहे.शिवाय ती ऑनलाइन योगा क्लासेस घेत आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा - सोनम होणार राणा दग्गुबतीची मेहुणी? कपूर फॅमिलीशी मिहिकाचं काय आहे कनेक्शन