मुंबई, 6 मे : अभिनेत्री मलायका अरोरा काही ना काही कारणानं नेहमीच चर्चेचा विषय ठरते. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या लॉकडाऊनमुळे मलायका तिच्या घरी आहे. पण तिसऱ्यांदा पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यामुळे ती तिच्या घरातच अडकली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे तिला तिच्या जवळच्या व्यक्तींना भेटणं शक्य होत नाही. नुकताच तिनं तिच्या जवळच्या व्यक्तींचा फोटो शेअर करत 50 दिवस झाल्यानंतर काहीच बदललं नसल्यानं मलायकाला तिच्या जवळच्या व्यक्तींची किती आठवण येत आहे हे तिनं सांगितलं आहे. पण यात अर्जुन कपूरचा मात्र समावेश नाही आहे. मलायकानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं आता 50 दिवसांनंतर खास व्यक्तींमध्ये लॉकडाऊनमळे आलेला हा दुरावा आता सहन होत नसल्याचं म्हटलं आहे. मलायकानं तिचे आई-वडील आणि बहीण अमृता यांच्यासोबतचा एक फोटो यासोबत शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिनं हार्ट इमोजी वापरल्या आहेत. तसेच तुमची सर्वांची आठवण येत असल्याचं तिनं म्हटलं आहे.
मलायकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. पण यात अर्जुन कपूर नसल्यानं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. या फोटोवरुन लक्षात येत की या लॉकडाऊनमध्ये मलायका तिच्या कुटुंबाला किती मिस करत आहे. काही दिवसांपूर्वी तिनं मुलगा अरहानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता. ज्यात लहानगा अरहान मलायकाला किस करताना दिसत होता. याशिवाय मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. दोघांनीही सुरुवातीला हे नातं लपवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र नंतर त्यांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं. मात्र लग्नाच्या प्लानिंग विषयी बोलायला दोघांनीही नकार दिला आहे. सध्या आम्ही कामावर लक्ष देत असून एकमेकांना आणखी जाणून घेण्यासाठी आम्हाला काही वेळाची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (संपादन- मेघा जेठे) धक्कादायक! प्रियांका चोप्राच्या काकांना भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवून लुटलं अक्षय कुमारला ‘गे’ समजायची सासू, ट्विंकलशी लग्न करण्यासाठी ठेवली होती ही अट