JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'विवाहित स्त्रिया सुखी नाहीत तर...' महिला दिनानिमित्त मलायकाची पोस्ट VIRAL

'विवाहित स्त्रिया सुखी नाहीत तर...' महिला दिनानिमित्त मलायकाची पोस्ट VIRAL

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मलायकाने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. नेहमी आपल्या फोटोमुळे चर्चेत असणारी मलायका यावेळी तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 मार्च : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हा बॉलिवुडमधील नेहमीच चर्चेत राहणारा चेहरा आहे. तिचे फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. Paparazzi तर तिच्या मागे कायम असतात. अर्जून कपूरबरोबर सुद्धा अनेकदा ही अभिनेत्री दिसते, त्यावेळचे तिचे फोटो विशेष व्हायरल होतात. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मलायकाने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. मलायकाने महिला दिनानिमित्त बोल्ड फोटो शेअर करत त्याला एक लांबलचक कॅप्शन दिली आहे. (हे वाचा- नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या ‘नारीशक्ती’ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान ) नेहमी आपल्या फोटोमुळे चर्चेत असणारी मलायका यावेळी तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आहे. तिने महिला दिनानिमित्त हा फोटो शेअर केला आहे.मलायका तिच्या पोस्टमध्ये म्हणते आहे की, ‘आज विवाहित स्त्रिया सर्वात आनंदी नाहीत, किंवा ज्या एकट्या आहेत त्याही नाहीत,  ज्यांचं स्थिर करियर आणि चांगलं उत्पन्न आहेत त्या सुद्धा सर्वाधिक आनंदी नाहीत. तर सर्वात आनंदी स्त्रिया त्या आहेत ज्या स्वतःवर संपूर्ण आणि खरोखर प्रेम करतात. ज्या स्त्रियांनी भूतकाळ विसरला, स्वाभिमान कमावला आणि स्वाभिमानाला सर्वात जास्त किंमत दिली.’

ती पुढे म्हणाली की, ‘ज्यांनी अत्याचारांना बळी पडणे थांबवले. ज्यांनी राग,अश्रू आणि आयुष्यातील कडूपणा मागे सोडला.  ज्यांना समजलं की आनंद ही एक वैयक्तिक निवड आणि जबाबदारी आहे. त्या आनंदी आहेत कारण त्यांना कोणाकडूनही आनंदासाठी प्रमाणीकरण आवश्यक नाही. आनंदासाठी त्यांना कोणाची आवश्यकता नाही. या सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा.’ अशा सुंदर शब्दात मलायकाने महिला दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या