मुंबई, 15 ऑक्टोबर : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिचे फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मलायका तिच्या फिटनेसबाबत एवढी जागरुक आहे की ती कोणत्याही करणासाठी आपलं फिटनेस रुटीन सोडत नाही. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरही तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. आताही ती अशाच एका व्हिडीओमुळे सध्या मलायकाच्या नावाची चर्चा होत आहे. 45 वर्षीय मलायकाचा फिटनेस आताच्या तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारा आहे. जिम व्यतिरिक्त मलायका योग सुद्धा करते. तसेच आपल्या फिटनेसचं सर्व श्रेयही ती योगाला देते. तिच्या फिटनेसला बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री फॉलो करतात. स्वतःला फिट ठेवण्यासाठी मलायका प्रचंड मेहनत घेते. सध्या मलायकाचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात ती जिममध्ये एक्सरसाइज करताना दिसत आहे. पती रणवीरच्या माघारी असं काही म्हणाली दीपिका, ज्याची तिलाच वाटू लागली भीती
मलायकानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत हा व्हिडीओ 17 लाखांहून जास्त लोकांनी पाहिला आहे. यातील मलायकाच्या मूव्हज पाहिल्यावर ती फिटनेसवर किती मेहनत घेत असेल हे लक्षात येतं. आवरा! भर कार्यक्रमात आलिया भटची जीभ घसरली, सर्वांसमोर दिली ‘ही’ शिवी
मलायका अरोरा मागच्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशिनशिपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती दरम्यान लग्नाचा विचार अद्याप न केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र हे दोघंही अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. टीव्ही अभिनेत्रीनं बिकिनी फोटोमध्ये दाखवले शरीरावरील व्रण, म्हणाली… ============================================================= मनसेसाठी निवडणुकीच्या प्रचारात उतरला अभिनेता सिद्धार्थ जाधव, पाहा VIDEO