JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: वरमाला घालण्यासाठी वनिता सुमितला उचलून घेतलं अन् पुढे जे घडलं...तुम्हीच पाहा

VIDEO: वरमाला घालण्यासाठी वनिता सुमितला उचलून घेतलं अन् पुढे जे घडलं...तुम्हीच पाहा

वनिता आणि सुमितच्या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रेटी कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आता तिच्या लग्नाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काय आहे त्या व्हिडिओमध्ये पाहा.

जाहिरात

वनिता खरात-सुमित लोंढे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 फेब्रुवारी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात काल सुमित लोंढेसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने आपल्या लग्नाच्या चर्चांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिचं प्री वेडिंग फोटोशूट देखील चर्चेत आलं होतं. वनिता आणि सुमितच्या  फोटोंवर चाहते आणि सेलिब्रेटी कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आता तिच्या लग्नाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काय आहे त्या व्हिडिओमध्ये पाहा. वनिता आणि सुमितच्या लग्नसोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये वनिता व सुमितच्या लग्नाची धामधुम पाहायला मिळत आहे. फिल्मीवाला या इन्स्टाग्राम पेजवरुन वनिता व सुमितच्या लग्नातील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नातील खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. हेही वाचा - Maharashtrachi Hasyajatra फेम वनिता खरातचा लग्नात झक्कास उखाणा; ऐकून तुम्हीही म्हणाल क्या बात… या व्हिडिओमध्ये मंगलाष्टका संपताच वनिता व सुमितला वरमाला घालण्यासाठी उचलून घेतलं. दोघांनीही मजामस्ती करत एकमेकांना वरमाला घातली.  त्यानंतर एकमेकांना हार घातल्यानंतर लग्नातील वऱ्हाडी मंडळींची धामधुम पाहायला मिळत आहे. लग्नातील या खास क्षणाच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

सुमित आणि वनिताची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरु होती. या दोघांनी लग्नाचा खुलासा तर केला होता मात्र लग्नाची तारीख जाहीर केली नव्हती. दरम्यान या दोघांनी आपल्या प्री वेडिंग, हळदी, मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने लग्नाची तारीख उघड झाली होती. अखेर काल २ फेब्रुवारीला या दोघांनी सात फेरे घेत जन्मभराचीगाठ बांधली आहे. वनिता आणि सुमितच्या लग्नाला हास्यजत्रेची संपूर्ण टीम उपस्थित होती. या टीमने लग्नात चार चांद लावत धम्माल केली आहे. मेहंदी, हळदीपासून ते लग्न रिसेप्शनपर्यंत सर्वच कार्यक्रमांत या कलाकारांनी धम्माल डान्स करत एन्जॉय केला आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्राच्या  टीमने वनिताच्या लग्नात खूपच धम्माल केली. आता हे सगळे जण वनिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत या नवीन जोडप्याला आनंदी सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत. वनिता खरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तिचा नवरा सुमित लोंढेदेखील याच कार्यक्रमाचा भाग आहे. या दोघांनी आपल्या प्री वेडिंगचे फोटो शेअर केले होते. यामध्ये दोघेही लिपलॉक करत रोमँटिक पोझ देताना दिसून आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या