JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Maharashtrachi Hasyajatra : 'लॉली' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नम्रता संभेरावचा हटके VIDEO VIRAL

Maharashtrachi Hasyajatra : 'लॉली' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नम्रता संभेरावचा हटके VIDEO VIRAL

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवत असते. नुकतंच नम्रतानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलं आहे. पाहा VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जुलै : प्रेक्षकांना हास्याची मेजवानी देणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra). सोनी मराठीवर प्रदर्शीत होणारा हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. मात्र पुन्हा एकदा हा कार्यक्रम हास्याचा डोस घेऊन परतणार आहे. त्यामुळे सध्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अनेक फोटो, व्हिडीओ सतत व्हायरल होत असलेले पहायला मिळत आहे. अशातच शोमधील कलाकार अभिनेत्री नम्रता संभेरावनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवत असते. अशातच कार्यक्रम पुन्हा भेटीला येत असल्यामुळे तीदेखील प्रेक्षकांना पोट धरुन हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच नम्रतानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलं आहे. यामध्ये ती नव्या लुकमध्ये दिसत आहे. तिचा हा लुक महाराष्ट्राची हास्यजत्रामधील असणार आहे. ट्रान्झिशन व्हिडीओ बनवत तिनं कार्यक्रमातील तिच्या नव्या लुकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. हेही वाचा -  अथिया-केएल राहुल झाले रोमँटिक! अभिनेत्रीने शेअर केला आपला सर्वात आवडता PHOTO ‘जब मै तैयार होकर आऊंगी ना तब तुम्हारे होश उड जायेंगे’ या आवाजावर नम्रतानं हे रील बनवलं आहे. तिच्या भन्नाट रीलवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. या व्हिडीओसोबत नम्रतानं लिहिलं की, लॉली लवकरच महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत येणार आहे. त्यामुळे यावेळी नम्रताच्या भूमिकेचं नाव लॉली असल्याचं दिसतंय. तिचा लुक पाहून चाहतेही उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

‘टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा’ 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. यामध्ये दिग्गज विनोदवीर समीर चौगुले, वनिता खरात, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर,गौरव मोरे आपल्या विनोदाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना हसवून लोटपोट करतात. सोम ते गुरुवार रात्री 9 वाजता हा शो सर्वांना पाहता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या