अभिनेत्री मधुराणी गोखलेच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नवऱ्याने सोडलं मौन
मुंबई, 21 जुलै : आई कुठे काय करते मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले ही नवरा प्रमोद प्रभुलकरला घटस्फोट देत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अभिनेत्री मधुराणीनं घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चांनी मधुराणीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान मधुराणीचा नवरा प्रमोद यांनी या चर्चांवर मौन सोडलं आहे. या चर्चांना काहीच अर्थ नसून या निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रमोद यांच्या खुलास्यानंतर मधुराणीच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. प्रमोद प्रभुलकर हे स्वत: दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. मिरॅकल अँक्टिग स्कूलचे मालक आहेत. मधुराणी आणि त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ई-टाइम्सशी बोलताना मौन सोडलं. त्यांनी म्हटलं, “आमच्या घटस्फोटाच्या चर्चा निराधार आहेत. आम्ही दोघंही एकत्र आणि आनंदी आहोत. सोशल मीडियावर आमचा एकही फोटो नाही याचा अर्थ आमच्या नात्यात काही प्रॉब्लेम आहेत असा होत नाही”. हेही वाचा - प्राजक्ता माळीनं धारण केलं मौनव्रत, काही दिवस मोबाईलही राहणार बंद; म्हणाली, कधीही आश्रमवासी… चर्चांचा मुलीवर परिणाम होतोय प्रमोद प्रभुलकर पुढे म्हणाले, “आमच्या घटस्फोटाच्या बातम्या पूर्णपणे थोट्या आहेत. आम्ही तिघेही खूप आनंदात आहोत. या सगळ्या चर्चांना आमच्या मुलीवर स्वरालीवर परिणाम होत आहे. या बातम्यांनंतर आम्हाला आमचे नातेवाई, मित्र मैत्रिणींचे फोन आले. या बातम्या त्यांना देखील शॉक बसला”.
यामुळे रंगल्या होत्या चर्चा यापूर्वी मधुराणी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अँक्टिंग अकॅडमीसोबत कार्यरत राहणार नाही. असे स्पष्ट केले होते. वाढलेल्या कामाच्या व्यापामुळे मला संस्थेत वेळ देता येत नाही असं मधुराणीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्याआधी मधुराणी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लेक स्वरालीबरोबर एकटीच ऑस्ट्रेलिया ट्रिपला गेली होती. तेव्हा देखील प्रमोल प्रभुलकर तिच्याबरोबर नव्हते. मधल्या काही दिवसांपासून ती फक्त मालिकांची अपेडट्स, तिच्या कविता आणि लेकीबरोबरचे फोटो शेअर करताना दिसते. यावरून मधुराणी आणि तिच्या नवऱ्यात काहीतरी बिनसल्याचं म्हटलं गेलं होतं मात्र प्रमोद यांच्या स्पष्टीकरणानंतर चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.