मुंबई, 14 मे- एकता कपूर निर्मित आणि कंगना रणौत होस्टेड ‘लॉक अप’ (Lock Upp) या रिऍलिटी शोचा पहिला सीजन (Season 1) प्रचंड चर्चेत राहिला नुकतंच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. पहिल्या एपिसोडपासूनच आघाडीवर राहिलेल्या स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) शो जिंकला. ‘लॉक अप’ सीजन 1 चा विजेता बनण्यासोबतच मुनव्वर फारुकीने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. संपूर्ण शोमध्ये त्याला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. मुनव्वर फारुकीने केवळ ट्रॉफीच जिंकली नाही तर बक्षिसाची मोठी रक्कमही मिळवली आहे. तथापि आता तो शोमधून बाहेर आल्यापासून सतत चर्चेत आहे. ‘लॉकअप’ व्यतिरिक्त मुनव्वर फारुकी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चेत आहे. अलीकडेच मुनव्वर त्याची गर्लफ्रेंड नाजीला सिताशीसोबत (Girlfriend Nazila Sitashi) बाईक राईड करताना दिसून आला. शोमधून बाहेर आल्यांनतरसुद्धा लॉकअप विजेता मुनव्वर फारुकी चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुनव्वर फारुकीचा आहे. कॉमेडियनला नुकतंच म्हणजे शुक्रवारी रात्री, त्याची गर्लफ्रेंड नाजीला सिताशीसोबत बाईकवरुन जाताना स्पॉट केलं गेलं. हे दोघे लव्हबर्ड्समुव्ही डेटवे निघाले होते. जिथे पापाराझींनी या जोडप्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. या दोघांनी आनंदाने त्यांना पोजदेखील दिल्या. मुव्ही डेटनंतर, मुनव्वर नाजीलासोबत बाईक राइडवर गेला होता. ज्याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी मुनव्वरचा हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघे एकत्र बाईकवर जाताना दिसत आहेत. अनेक युजर्सनी व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, मुनव्वर हेल्मेट घातलेला दिसत आहे तर त्याची गर्लफ्रेंड नाजीला मागच्या सीटवर बसलेली दिसत आहे.
लॉकअपमध्ये मुनव्वर फारुकी आणि अंजली अरोरामध्ये जवळीकता निर्माण झाली होती. या दोघांमध्ये बाहेर नक्की काहीतरी होणार अशी चाहत्यांना अपेक्षा होती. सोशल मीडियावर या दोघांसाठी मुंजली हा हॅश टॅगसुद्धा व्हायरल होत होता. परंतु लॉकअप जिंकल्यानंतर लगेचच मुनव्वरने आपल्या गर्लफ्रेंडसोबत एक मिरर सेल्फी शेअर करत सर्वांनाच धक्का दिला होता. तसेच ‘लॉकअप’च्या सक्सेस पार्टीला मुनव्वर फारुकीने गर्लफ्रेंड नाजीलासोबत हजेरी लावली होती.