JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Liger फ्लॉपचा कलाकारांसोबत वितरकांना मोठा फटका, भरपाईसाठी उचललं मोठं पाऊल

Liger फ्लॉपचा कलाकारांसोबत वितरकांना मोठा फटका, भरपाईसाठी उचललं मोठं पाऊल

अभिनेता विजय देवरकोंडा हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार आहे. पण त्याचं बॉलिवूड पदार्पण फारच वाईट ठरलं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही . विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा ‘लायगर’ हा चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 सप्टेंबर-  अभिनेता विजय देवरकोंडा हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार आहे. पण त्याचं बॉलिवूड पदार्पण फारच वाईट ठरलं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही . विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा ‘लायगर’ हा चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला.  आणि तो पाहिल्यानंतर लोकांच्या सतत नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. सुमारे 125 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटामुळे वितरक आणि निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. लायगर हा विजय देवरकोंडाच्या कारकिर्दीतील सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. नुकतंच या चित्रपटाच्या साऊथ वितरकाने आपल्याला झालेल्या तोट्याबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे. वितरकांना मोठं नुकसान- ‘लायगर’च्या वितरकाने चित्रपटाच्या अपयशाबद्दल, त्यांना किती त्रास सहन करावा लागला याबाबत आणि बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडचा त्यांना कसा फटका बसला या सर्व विषयांवर स्पष्ट उत्तरे दिली आहेत. ईटीशी ला दिलेल्या मुलाखतीत, दक्षिणेतील वितरक वारंगल श्रीनू म्हणाले, ‘मी एका वर्षात 100 कोटी गमावले नाहीत. पण हे खरं आहे की, मोठ्या प्रमाणात पैसे गमावले आहेत यात काहीच शंका नाही. लायगरमधील गुंतवणुकीतून मला सुमारे 65 टक्के म्हणजेच सुमारे 81.25 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांनी उघड केलंय. वारंगल श्रीनू यांनी पुढे बोलताना ‘बॉयकॉट बॉलिवूड’वरही संवाद साधला.याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं, ‘त्याला अतिआत्मविश्वास होता की नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु हे लक्षात घ्यायला हवं की, कलाकार आणि निर्मात्यांवर बंदी घालण्याच्या नावाखाली आम्ही सेटवरील गरीब क्रू सदस्यांची कुटुंबे उध्वस्त करत आहोत. अशा परिस्थितीत ज्यांचं दैनंदिन जीवन त्यावर अवलंबून आहे अशा अनेक कुटुंबांमध्ये अराजकता निर्माण होईल.आणि चित्रपटांमध्ये घट होईल’. (हे वाचा: VIDEO: आलिया भट्टने बनवला खास शरारा ड्रेस; बाळासाठी लिहलाय अनोखा मेसेज ) त्यांनी पुढे म्हटलं, ‘सध्या चित्रपटसृष्टी अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. आणि सोशल मीडियावर अन्यायकारकी बॉयकॉट ट्रेंडमध्ये सहभागी असणाऱ्या युजर्सचा बोलबाला झाला आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. हे पूर्णपणे अनावश्यक आहे. तुम्ही आधी चित्रपट पाहा आणि तुम्हाला तो आवडला नाही तर त्याकडे दुर्लक्ष करा. पण तुम्ही तो चित्रपट न पाहताच रिलीज होण्यापूर्वी त्यावर बंदी नका आणू’. (हे वाचा: चित्रपटासाठी अभिनेत्यानं कमी केलं 18 kg वजन; आता ओळखणंही झालं कठीण ) निर्मात्यांनी उचललं मोठं पाऊल- ‘लायगर’च्या वितरकांना झालेलं नुकसान पाहून दिग्दर्शक-निर्माते पूरी जगन्नाथ भावुक झाले आहेत. वारंगल श्रीनू यांच्यामते पूरी जगन्नाथ वितरकांना भेटण्यासाठी हैद्राबादमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्याशी नुकसानाबाबत संवाद साधून शक्य तितकी भरपाई देण्याचा विचार करत आहेत’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या