मुंबई: हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो द कॅप्रिओ (Leonardo DiCaprio) सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. आता तो चेन्नईतील पाणी टंचाईसंबंधी एक पोस्ट केल्यानं चर्चेत आला आहे. भारतात नुकतीच पावासाला सुरुवात झाली असली तरीही भारतातल्या अनेक ठिकाणी आजही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दक्षिण भारतातलं चेन्नई शहर त्यापैकीच एक. सध्या चेन्नईमध्ये प्रचंड पाणी टंचाई सुरू आहे. याविषयीचं वृत्त बीबीसीनं नुकतंच प्रसिद्ध केलं होतं. यावरून लिओनार्डोनं त्याच्या सोशल मीडियावर शेअर एक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. Birthday Special : …म्हणून अर्जुन कपूरच्या घरात एकही सिलिंग फॅन नाही टायटॅनिक फेम हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो द कॅप्रिओनं चेन्नईतील पाणी टंचाईबाबत त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं लिहिलं, ‘दक्षिण भारतातील चेन्नई आता ज्या परिस्थितीत आहे त्यातून या शहराला फक्त पाऊसच वाचवू शकतो. या ठिकणच्या सर्व विहीरी कोरड्या पडल्या आहेत आणि शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या या शहरात ट्रॅन्करनं पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. जमिनीतील सर्व पाणी पुरवठा संपल्यानं आता या शहराला पूर्णपणे पर्यायी पाणी साठ्यांवर अवलंबून राहावं लागत आहे. त्यामुळे आता सर्वजण पावसाच्या येण्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.’
लिओनार्डो 2015 ला त्याच्या Beyond the Flood या डॉक्यूमेंट्री फिल्मसाठी भारतात आला होता. तो अभिनेता असण्यासोबतच पर्यावरणप्रेमीही आहे. याशिवाय त्याची Leonardo DiCaprio Foundation ही संस्थाही आहे. जी पर्यावरण जागरुकतेसाठी काम करते. या संस्थेकडून पर्यावरण पूरक कामांसाठी निधी उभा केला जातो. 2016 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बोलताना लिओनार्डो म्हणाला, ‘वातावरणातील बदल हे खरे असून ते सध्या खूप वेगानं घडत आहेत. संपूर्ण जगासाठी ही खूप गंभीर समस्या आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.’ VIDEO : सलमानचे वडील सलीम खान यांनी गायलेलं रोमँटिक गाणं तुम्ही ऐकलं का? सध्या लिओनार्डो त्याच्या आगामी सिनेमा ‘वन्स अपॉन टाइम इन हॉलिवूड’ (Once Upon a Time in Hollywood) ची तयारी करत आहे. या सिनेमात त्याच्या सोबत हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट सुद्धा दिसणार आहे. हा सिनेमा ऑगस्टमध्ये भारतात रिलीज होण्याची शक्यता आहे. सलमान पुन्हा चढणार कोर्टाची पायरी, आता केली पत्रकाराला मारहाण =============================================================== अक्षयचा ‘सूर्यवंशी’मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी