अभिनय बेर्डे
मुंबई, 1 ऑक्टोबर : झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. धमाकेदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करून स्पर्धक प्रेक्षकांचं मन जिंकतात. अशातच या कार्यक्रमातील पुढील भागात अभिनेता अभिनय बेर्डेची उपस्थिती पहायला मिळणार आहे. याचा एक प्रोमोे समोर आला असून या व्हिडीओनं सगळ्यांना भावूक केलं आहे. अभिनयचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ च्या आगामी भागाचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये अभिनय बेर्डे आपल्या वडिलांना म्हणजेच दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत ब्रेर्डे यांना एक भावूक कॉल करताना दिसत आहे. या कॉलमध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डेंनं दिलेला सल्ला सांगताना दिसत आहे. हा भावूक कॉल पाहून प्रेक्षकही भावूक झाले आहेत. हेही वाचा - Sonalee Kulkarni: सिनेसृष्टीतील ‘ही’ अभिनेत्री आहे सोनालीची बेस्ट फ्रेंड; फोटो शेअर करत म्हणाली ‘नवदुर्गा’ अभिनयने लक्ष्मीकांत बेर्डेंना केलेल्या कॉलमध्ये म्हटलं की, ‘बाबा तुम्ही मला सांगायचात मला आठवयतंय भूमिका कुठलीही असो, हजार टेंशन घेऊन आलेला प्रेक्षक आपलं नाटक बघून घरी जाताना खिशात नाटकाच्या तिकिटाबरोबर मन भरुन लाफ्टर घेऊन गेला पाहिजे. पंच बोललेल्या वाक्यात नाहीये तर न बोललेल्या दोन वाक्यांमधील टाइमिंगवर आहे. अभिनय ते टाइमिंग ओळख. अभिनय प्रेक्षकांचा झाला पाहिजे तर प्रेक्षक अभिनयचे होतील. बाबा आज कळतंय तुमचं वाक्य. एक काळ होता लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय अख्ख्या महाराष्टाने लक्षात ठेवला होता. बाबा तुम्हाला वचन देतो की त्या लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा अभिनयही अख्खा महाराष्ट्र लक्षात ठेवेल. आय लव यू बाबा.’
अभिनय बेर्डेचा हा भावूक कॉल ऐकूण सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी तरळून गेलं. सोशल मीडियावर काही क्षणातच हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. अभिनयच्या कॉलने सगळ्यांना लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण करुन दिली. व्हिडीओवर ‘मीस यू लक्ष्मीकांत बेर्डे’ अशा कमेंट येत आहेत.
दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डेच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा मुलगा अभिनय बेर्डेही कलाविश्वात आला आहे. अभिनय लवकरच त्याचा आगामी चित्रपट ‘मन कस्तुरी रे’ दिसणार आहे. या चित्रपटाच त्याच्यासोबत अभिनेत्री तेजस्वी प्रकाश दिसणार आहे. तेजस्वी या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ येत्या 4 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.