शाहरूख खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई, 12 जून - अमलीपदार्थ प्रकरणातून आर्यन खान याच्या सुटकेसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान यालाही आरोपी करण्याचे आदेश द्या, अशी मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात शाहरूख खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंसोबत अभिनेता शाहरुख खान यालाही आरोपी करण्यात यावे यासाठी एका वकिलाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अॅडव्होकेट निलेश ओझा यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. सोमवारी ओझा यांनी शाहरुख खान विरोधातील ही याचिका कोर्टात दाखल केली आहे. त्यामुळे लवकरच याप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच शाहरूख याची नार्को, ब्रेन मॅपिंगसह खोटे पकडणारी चाचणी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. वाचा- 50व्या वर्षी चौथ्यांदा बाप झाला प्रभुदेवा; घराण्यात पहिल्यांदा जन्मली मुलगी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र सध्या समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. सीबीआयने वानखेडे यांच्या अटकेवरील स्थगिती उठवण्याची विनंती हायकोर्टाकडे केली आहे. त्याविरोधात वानखेडे यांनी याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. मात्र आता या प्रकरणात ही नवीन माहिती समोर आली आहे. यामुळे शाहरूखच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार, लाच घेणाऱयासह लाच देणाराही दोषी असतो. शिवाय लाच दिल्याचा आरोप सिद्ध झाल्यास संबंधित आरोपी पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असतो. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, वानखेडे यांनी स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावी याच्यामार्फत शाहरूख याच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली होती. शाहरूख याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) याबाबत माहिती न देताच लाचेची रक्कम दिल्याचाही सीबीआयचा आरोप आहे. त्यामुळे कायद्यानुसार, शाहरूख यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात यावे, असे आदेश देण्याची मागणी वकील राशीद खान यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. एनसीबीचे माझे अधिकारी समीर वानखेडे यांनी गोव्याला जाणार्या क्रूझवरुन शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. आर्यन खान याला आरोपी न बनवण्याच्या बदल्यात 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे सीबीआयने नुकतीच वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. तथापि, वानखेडे यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेत सीबीआयकडे दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे आदेश दिले होते.