JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा म्यूझिक VIDEO लवकरच होणार रिलीज; फोटो झाले VIRAL

सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा म्यूझिक VIDEO लवकरच होणार रिलीज; फोटो झाले VIRAL

सध्या इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ आणि शेहनाजची काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हि फोटो त्यांच्या या शेवटच्या म्युजिक व्हिडीओच्या शूटिंगची आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, ९ सप्टेंबर-  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता**(Actor)** आणि बिग बॉस विजेता**(Bigg Boss Winner)** सिद्धार्थ शुक्ला**(Sidharth Shukla)** च्या अकाली मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याच्या कुटुंबा सोबत त्याचे मित्र आणि चाहत्यांना सुद्धा यावर विश्वास ठेवणं अजूनही कठीण आहे. तसेच दुसरीकडे सिद्धार्थची गर्लफ्रेंड शेहनाज गिलचीदेखील **(Shehnaz Gill)**वाईट अवस्था आहे. शेहनाज आणि सिद्धार्थ ची लव्हस्टोरी चाहत्यांना खूपच पसंत पडत होती. सोशल मीडियावर या कपलला प्रचंड पसंत केलं जात होत. सिद्धार्थ आणि शेहनाजने काही दिवसांपूर्वीच एका म्युजिक व्हिडीओ मध्ये एकत्र काम केल आहे. तो सॉंग लवकरच रिलीज केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

सध्या इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ आणि शेहनाजची काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हि फोटो त्यांच्या या शेवटच्या म्युजिक व्हिडीओच्या शूटिंगची आहेत. हि BTS फोटोज सध्या सर्वांना भावुक करत आहेत. यामध्ये सिडनाज अर्थातच सिद्धार्थ आणि शेहनाज बिचवर दिसून येत आहेत. या सॉंगचं नाव ‘हॅबिट’ असं आहे. हे गाणं श्रेया घोषालचं आहे. एका फोटाग्राफरने आपल्या इन्स्टाग्राम वर हे फोटो शेयर केले आहेत. (हे वाचा: हिजाब घालण्याचा मिळाला सल्ला; उर्फी म्हणाली, ‘मी मुस्लिम म्हणून मला…. ) हे व्हायरल झालेले फोटो पाहून चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे, ‘प्लिज गाणं लवकर रिलीज करा प्रतीक्षा नाही होत आता’, तर दुसऱ्याने म्हटलं आहे. ‘गाणं जितकं शूट झालं आहे तितकंच रिलीज करा. आम्हाला एकदा सिद्धार्थ आणि शेहनाज ला पुन्हा एकत्र पाहायचं आहे’. अशा पद्धतीने चाहते भावुक कमेंट्स करत आहेत. (हे वाचा: सर्जरी नाही तर या पद्धतीने केले ओठ मोठे; BB फेम उर्फी जावेदनं सांगितलं सत्य ) ‘बिग बॉस १२’ मध्ये हे दोघेही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यामध्ये जवळीकता निर्माण झाली होती. या दोघांची अनोखी केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. या दोघांना चाहते नेहमी एकत्र पाहण्यासाठी धडपडत असत. या दोघांनी अनेक कार्य्रक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली होती. तसेच दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं देखील म्हटलं जात होता. मात्र सिद्धार्थच्या अशा अचानक मृत्यूने शेहनाजसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या