JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'जिहाल ए मिस्की मकुन बरंजिश'; 90 टक्के लोकांना आजही माहिती नाही लतादीदींच्या या गाण्याचा अर्थ

'जिहाल ए मिस्की मकुन बरंजिश'; 90 टक्के लोकांना आजही माहिती नाही लतादीदींच्या या गाण्याचा अर्थ

Lata Mangeshkar Song: अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि अनिता राज यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘जिहाल-ए-मिस्कीं मकुन बरंजिश’ हे होय. हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,11 एप्रिल- भारतीय चित्रपटांमध्ये गाणी हा नेहमीच चित्रपटाच्या कथानकाचा अविभाज्य भाग राहिला आहे. गाण्यांशिवाय कोणताही भारतीय सिनेमा पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळेच आपली म्युझिक इंडस्ट्री फारच मोठी आहे. यामध्ये अनेक गायकांनी आपल्या आवाजाने लोकांनां मंत्रमुग्ध केल आहे. बऱ्याचवेळा चित्रपट फ्लॉफ झाला तरी गाणी सुपरहिट ठरतात अशीही काही उदाहरणे आहेत.तसेच अनेकवेळा असं होतं की आपल्याला एखादं गाणं पप्रचंड आवडतं. आपण ते नेहमीच गुणगुणत असतो परंतु आपल्याला त्याचा अर्थच माहिती नसतो. चित्रपटांतील गाण्यांमध्ये सोयीनुसार त्या-त्या बोली भाषेतील खास शब्द वापरुन वाक्यरचना केलेली असते. त्यामुळे अनेकांना गाण्याचे नेमके अर्थ समजत नाहीत. असंच एक गाणं म्हणजे अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि अनिता राज यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘जिहाल-ए-मिस्कीं मकुन बरंजिश’ हे होय.

हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. अनेक लोक हे गाणं गुणगुणत असतात. शिवाय अनेक सिंगिंग रिऍलिटी शोमध्ये हे गाणं आवर्जून सादर केलं जातं. मात्र जवळजवळ 90 टक्के लोकांना या गाण्याचा खरा अर्थच माहिती नाहीय. (हे वाचा: ऐश्वर्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेत विवेकने सलमानला असं काय म्हटलं होतं? भाईजान आजही पाहात नाही तोंड ) ‘जिहाल-ए-मिस्कीं मकुन बरंजिश’ हे गाणं गानकोकिळा लता मंगेशकर आणि सुप्रसिद्ध गायक शब्बीर कुमार यांनी गायलं होतं. तर हे गाणं ज्येष्ठ लेखक गुलजार यांनी लिहलं आहे. गुलजार यांनी लिहलेली गाणी नेहमीच समजायला जड परंतु तितकीच अर्थपूर्ण असतात. हेसुद्धा त्यातीलच एक गाणं आहे. हे गाणं गुलजार यांनी एका कवितेपासून प्रेरित होऊन लिहल्याच सांगितलं जातं.

सुप्रसिद्ध कवि अमीर खुसरो यांची एक लोकप्रिय कविता आहे. त्यांनी फारसी आणि बृजभाषेचा वापर करुन ही कविता लिहली आहे. याच कवितेमधून प्रेरणा घेऊन गुलजार यांनी ते सदाबहार गाणं लिहलं आहे. जे गाणं आजही लोक तितक्याच आवडीने ऐकतात आणि गुणगुणतात.

गाण्याच्या पहिल्या चार ओळींचा अर्थ- ‘जिहाल-ए-मिस्कीं मकुन बरंजिश बेहाल-ए-हिजरा बेचारा दिल है सुनाई देती है जिसकी धड़कन तुम्हारा दिल या हमारा दिल है’ माझ्यापासून नजर चुकवून आणि मला कारणे देऊन तू माझ्या असहाय्यतेची खिल्ली उडवू नकोस. तुझ्यापासून दूर जाण्याच्या विचारांनी माझा जीव जात आहे. माझा जीव कासावीस झाला आहे’. असा या ओळींचा अर्थ आहे. जो बहुतांश लोकांना अजूनही माहिती नाहीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या