JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Lalit Modi First wife: आईच्या मैत्रिणीशीच केलं होतं लग्न, सुष्मिता सेनबरोबरच्या अफेअरने पुन्हा वादात अडकला IPL Founder

Lalit Modi First wife: आईच्या मैत्रिणीशीच केलं होतं लग्न, सुष्मिता सेनबरोबरच्या अफेअरने पुन्हा वादात अडकला IPL Founder

उद्योगपती ललित मोदी यांनी सुष्मितासोबत खाजगी फोटो शेअर करत आपण दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला. तेव्हापासून सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि दोघांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बातम्या सुरु झाल्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जुलै : सध्या सोशल मीडियावर एका नव्या कपलची जोरदार चर्चा सुरु आहे. हे कपल दुसरं तिसरं कोणी नसून इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Lalit Modi and Sushmita Sen)आहे. नुकतंच उद्योगपती ललित मोदी यांनी सुष्मितासोबत खाजगी फोटो शेअर करत आपण दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला. तेव्हापासून सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि दोघांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बातम्या सुरु झाल्या. सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्यातील संबंध अधिकृत होताच, सगळीकडे त्यांच्यांविषयीच चर्चा होत आहे. अशातच ललित मोदींच्या आयुष्यावर एक नजर टाकूया. ललित मोदींचं आयुष्य हे खूप वादग्रस्त राहिलं आहे. हेही वाचा -  Sushmita Sen: ललित मोदींना डेट करणारी सुष्मिता सेन आहे इतक्या कोटींची मालकीण;आकडा जाणून व्हाल थक्क 1985 मध्ये त्यांना विद्यापिठात ड्रग्ज विकल्याप्रकरणी अटक करण्यात आलं होतं. प्राणघातक शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी ताब्यातही घेण्यात आलं होतं. त्याच वर्षी त्यांच्यावर आणि आणखी एका विद्यार्थ्यावर अपहरणाचा आरोप होता. ललित मोदी यांनी 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात केली होती. ते आयपीएलचे चेअरमनही राहिले आहेत. त्यानंतर आयपीएलमध्ये हेराफेरी झाल्याच्या बातम्या आल्या, फिक्सिंगचे आरोप झाले, अरबांची फसवणूक झाली आणि हे सगळे आरोप ललित मोदींवर लावण्यात आले होते. आयपीएल वादानंतर ललित मोदी भारतातून पळून गेले होते. त्यांना भारतात आणण्यासाठी अनेक एजन्सी कार्यरत होत्या, पण त्यांना भारतात आणता आलं नाही. याशिवाय अनेक गोष्टींमुळे ते चर्चेत राहिले आहेत.

ललित मोदी यांनी त्यांच्या आईच्या मैत्रिणीशी लग्न केल्यामुळे चर्चेत आले होते. त्यांच्या आईची मैत्रिण मीनल त्यांच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठ्या होत्या. मात्र ललित त्यांच्या प्रेमात पडले. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि 1991 मध्ये त्यांनी घरच्यांच्या संमतीने लग्न केले. मीनलचे पहिले लग्न मोडल्यानंतर ललितने तिच्याशी लग्न केलं. 2018 मध्ये मीनलचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

सुष्मिता ललित मोदी आणि त्यांची पत्नी मीनल यांची खूप चांगली मैत्रीण आहे. दुसरीकडे, पत्नीच्या मृत्यूनंतर एकटे पडलेल्या ललित मोदींना सुष्मिता सेनने पुन्हा एकदा भावनिक आधार दिला आणि दोघांमध्ये जवळीक वाढली. ललित मोदी आणि सुष्मिता लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे दोघेगी गुपचुप लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या