प्रसिद्ध अभिनेत्याने अक्षय कुमारवर खळबळजनक आरोप केले आहेत.
मुंबई, 10 जून : कमाल रशीद खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतो. हा अभिनेता ट्विटरवर कायम सक्रिय असतो. बॉलिवूडच्या सिनेमांचे रिव्ह्यू देण्यासोबतच तो कलाकारांवर टीका करत असतो. सलमान खान ते शाहरुख खान आजवर कोणालाच केआरकेनं सोडलेलं नाही. KRK शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान सारख्या बॉलीवूड कलाकारांना, करण जोहरसारखे चित्रपट निर्माते आणि ‘पठाण’, ‘किसी का भाई किसी की जान’ आणि बरेच काही या सारख्या हिंदी चित्रपटांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. अशातच आता या अभिनेत्याने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये अक्षयवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये अक्षय कुमार आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत त्याच्यावर टीका केली आहे. ‘मी उद्या मारला गेलो तर सलमान खान, शाहरुख खान आणि करण जोहरने नाही तर अक्षयने हे केले हे सर्वांना कळले पाहिजे, असं तो म्हणाला आहे. केआरकेने पुढे खुलासा केला की अक्की बऱ्याच काळापासून त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता कारण त्याला केआरकेने ‘कॅनेडियन कुमार’ म्हणू नये असे त्याला वाटत होते.
केआरकेने ट्विट केले की, ‘अक्षय कुमार वगळतामाझे बॉलीवूडमधील सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. त्याने मला तुरुंगात मारण्याची सुपारी दिली होती. मला अटक केली होती. मी भाग्यवान होतो की मी तुरुंगातून बाहेर आलो. तो मला पुन्हा पोलीस ठाण्यात किंवा जेलमध्ये मारण्याची सुपारी देत आहेत. मला काही झाले तर त्याला अक्षय कुमार जबाबदार असेल. माझ्या मृत्यूशी शाहरुख खान, सलमान खान किंवा करण जोहरचा काहीही संबंध नाही. Kajol : ‘आयुष्यातील कठीण काळ’ म्हणत काजोलने का घेतली सोशल मीडियावरून एक्झिट? खरं कारण आलं समोर या पोस्टनंतर केआरकेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. केआरकेने पुढच्या ट्विटमध्ये अक्षयचा अगामी चित्रपट ओह माय गॉड २’ बाबत मोठा दावा केला आहे. केआरकेने ट्वीटमध्ये लिहिलं आहे. ‘खिलाडी’चे १० चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप ठरले आहेत. इतकंच नाही तर त्याचा पुढचा ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपटही फ्लॉप ठरणार आहे. याआधी सलमान खानबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केआरके अडचणीत आला होता. त्याच्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात आली होती.
KRK ने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मिस्टर कॅनेडियन अक्षय कुमारने हे समजून घेतले पाहिजे की मला तुरुंगात पाठवल्याने किंवा मला मारल्याने वास्तव बदलणार नाही. जग त्यांना नेहमीच कॅनेडियन कुमार म्हणेल. आणि ज्या दिवशी केंद्रात सरकार बदलेल, कुमार एकतर भारतातून पळून जातील किंवा तुरुंगात जातील. ते लिहून ठेवा.’ असं म्हणत त्याने अक्षय कुमारवर धक्कादायक आरोप केले आहेत. केआरकेने केलेल्या या दाव्यांची सगळीकडेच चर्चा होत आहे.