JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Koffee with Karan 7 : वरुणच्या उत्तरानं जिंकलं चाहत्यांचं मन; म्हणाला अभिनेता नाही तर 'ही' अभिनेत्री माझी स्पर्धक

Koffee with Karan 7 : वरुणच्या उत्तरानं जिंकलं चाहत्यांचं मन; म्हणाला अभिनेता नाही तर 'ही' अभिनेत्री माझी स्पर्धक

‘कॉफी विथ करण 7’मध्ये यावेळी अनिल कपूर आणि वरुण धवन कॉफी काउचवर दिसणार आहेत. आता या शो मध्ये वरूणने एक खुलासा केला आहे. ज्याची सगळीकडे चर्चा होत आहे.

जाहिरात

Koffee with Karan 7

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 मुंबई, 13 सप्टेंबर : करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण 7’ प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. प्रत्येक आठवड्यात नवीन स्टार्स शोमध्ये येतात, जे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलतात. अनेकवेळा स्टार्स शो दरम्यान काहीतरी बोलतात, जो चर्चेचा विषय बनतो. शोचे आतापर्यंत 10 एपिसोड आले आहेत ते सगळे लोकप्रिय ठरले आहेत. आता नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी अनिल कपूर आणि वरुण धवन कॉफी काउचवर दिसणार आहेत. प्रोमोमध्ये दोघेही खूप मस्ती करताना दिसत आहेत. आता या शो मध्ये वरूणने एक खुलासा केला आहे. ज्याची सगळीकडे चर्चा होत आहे. ‘कॉफी विथ करण 7’ शो दरम्यान वरुण धवनने इंडस्ट्रीमध्ये आपली स्पर्धा कोणाला मानतो याचा खुलासा केला आहे. करण जोहरने वरुणला इंडस्ट्रीमध्ये तू कोणाला तुझा स्पर्धक मानतोस असा प्रश्न विचारला. तेव्हा  वरुण धवनने आपली स्पर्धा कोणत्याही अभिनेत्याशी नाही हे सांगितले. आता हे उत्तर ऐकून तुम्हाला आता करण जोहरला आश्चर्यच वाटले. पण पुढे वरुणने उत्तर दिले कि, ‘मी इंडस्ट्रीमध्ये  फक्त एकाच कलाकाराला माझी स्पर्धा मानतो आणि ती म्हणजे आलिया भट्ट.’ तो पुढे म्हणाला कि, ‘एक समाज म्हणून आपल्यालाही हे मान्य करायला हवं की इतर अभिनेत्यांपेक्षा स्त्री अभिनेत्री मोठी असू शकते.आलिया भट्ट सध्या खूप चांगले काम करत आहे. त्यामुळे  मी एक अभिनेता म्हणून तिच्याकडून प्रेरणा घेतो आणि स्वतःही तेच करू इच्छितो.’’

संबंधित बातम्या

वरुण  धवन आणि आलिया भट्ट यांनी सिनेसृष्टीत एकत्र पदार्पण केले होते. मात्र वरूणच्या तुलनेने आलियाने स्वतःला एक दमदार अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. तिच्या अलीकडच्या भूमिकांमुळे तिच्याकडे एक सक्षम अभिनेत्री म्हणून पहिले जाऊ लागले आहे. त्याचबरोबर आलिया आणि वरूणची मैत्री सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे वरुणने दिलेल्या या उत्तरामुळे या दोघांचे चाहते खुश झाले आहेत. हेही वाचा - Cast of Brahmastra 2 : ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार ‘हे’ कलाकार; करण जोहरचा मोठा खुलासा याशिवाय प्रोमोमध्ये वरुण  आणि अनिल कपूर आणखी धमाल पाहायला मिळत आहे.  त्यामुळे शोचा प्रोमो पाहिल्यानंतर चाहते एपिसोडसाठी खूप उत्सुक आहेत. ‘कॉफी विथ करण 7’ चा 11 वा भाग गुरुवारी रात्री 12 वाजता Disney Plus Hotstar वर प्रसारित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या