JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kl Rahul-Athiya: ठरलं! केएल राहुल-अथिया शेट्टी 'या'ठिकाणी करणार ग्रँड वेडिंग; समोर आली तारीख

Kl Rahul-Athiya: ठरलं! केएल राहुल-अथिया शेट्टी 'या'ठिकाणी करणार ग्रँड वेडिंग; समोर आली तारीख

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सध्या क्रिकेटर केएल राहुलसोबतच्या नात्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. 2023 या नवीन वर्षात अनेक सेलिब्रेटी कपल्सच्या लग्नाचा अंदाज वर्तविला जात आहे. यामध्ये अथिया आणि केएल राहुलच्या नावाचादेखील समावेश आहे.

जाहिरात

के एल राहुल-अथिया शेट्टी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सध्या क्रिकेटर केएल राहुलसोबतच्या नात्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. 2023 या नवीन वर्षात अनेक सेलिब्रेटी कपल्सच्या लग्नाचा अंदाज वर्तविला जात आहे. यामध्ये अथिया आणि केएल राहुलच्या नावाचादेखील समावेश आहे. गेल्यावर्षीपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र मध्यंतरी केएल राहुलवर झालेली शस्त्रक्रिया आणि विविध सामन्यांमुळे हे लग्न पुढं ढकलल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान आता पुन्हा एकदा या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या लग्नाच्या काही डिटेल्स समोर आल्या आहेत. पाहूया नेमकं काय आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हे सेलिब्रेटी कपल या महिन्याच्या 20 तारखेनंतर कधीही विवाह बंधनात अडकू शकतं असं म्हटलं जात आहे. इ टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर अथिया आणि केएल राहुल आपल्या नव्या घरात संसार थाटणार आहेत. विशेष म्हणजे या सेलिब्रेटी कपलच हे नवं घर बॉलिवूड स्टार आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या घरापासून अगदी जवळ आहे. म्हणजेच या दोघांचे घर एकाच ठिकाणी असणार आहेत. **(हे वाचा:** ‘मी UPच्या प्रेक्षकांमुळे सुपरस्टार, बॉलिवूडही आता त्यांच्यांमुळे…’; सुनील शेट्टीचं वक्तव्य चर्चेत ) मीडिया रिपोर्टसनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचं लग्न इतर कुठे नव्हे तर खंडाळामध्ये होणार आहे. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांच्या या खंडाळा बंगल्यात हे जोडपं लग्नगाठ बांधणार आहे. फारच कमी लोकांना माहिती असेल की अभिनेता सुनील शेट्टीचा खंडाळा फार्महाउस अतिशय भव्य आणि आलिशान आहे. अर्थातच या लव्ह बर्ड्सचा विवाहसोहळासुद्धा तितकाच खास आणि भव्य असणार आहे. या रिपोर्ट्सनुसार केएल राहुल आणि अथिया शेट्टी अत्यंत खाजगी पद्धतीने आपला विवाहसोहळा पार पाडणार आहेत. या लग्नात अथिया आणि केएल राहुलचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि काही क्रिकेटर उपस्थित असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

परंतु एप्रिल महिन्यात हे जोडपं ग्रँड रिसेप्शनचं आयोज करणार असल्याची रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड, क्रिकेट आणि उद्योग जगतातील विविध सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या