JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तुमचा विश्वास कधीच...'; TVवर कमबॅक करण्याआधी किरण मानेंनी दिला चाहत्यांना शब्द

'तुमचा विश्वास कधीच...'; TVवर कमबॅक करण्याआधी किरण मानेंनी दिला चाहत्यांना शब्द

किरण माने सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची या मालिकेतून प्रेक्षकांना दिसणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच समोर आला आहे.

जाहिरात

किरण मानेंची नवी मालिका

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जुलै : मुलगी झाली हो या मालिकेमुळे अभिनेते किरण माने चांगलेच चर्चेत होते. महिलांबरोबर गैरवर्तणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. दरम्यान ते प्रकरण आता निवळलं असून किरण माने पुन्हा टेलिव्हिजनवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुलगी झाली हो मालिकेनंतर किरण माने बिग बॉस मराठी 4मध्ये स्पर्धक म्हणून आले होते. सीझनमध्ये त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला. बिग बॉसनं त्यांचं नशीब बदललं. आता ते नव्या मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. किरण मानेंची नवी कलाकृती प्रेक्षकांसमोर येण्याआधी त्यांनी चाहत्यांना एक शब्द दिला आहे. किरण माने सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची या मालिकेतून प्रेक्षकांना दिसणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच समोर आला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता पहायला मिळणार आहे. मालिकेत किरण माने कोणती भुमिका साकारणार आहेत हे त्यांनी अद्याप सांगितलेलं नाहीये पण त्यांच्या भुमिकेसाठी ते प्रचंड खुश आहेत. हेही वाचा -  Ketaki Chitale : खाताही येईना अन् बोलताही येईना; दीप अमावस्येच्या रात्री अशी झाली केतकीची अवस्था किरण मानेनी म्हटलंय, “प्रेक्षकहो, तुमचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीच तोडणार नाही. आता माझी ही जी कलाकृती येतेय… ती तुमचे मनोरंजन तर करेलच, पण तुमचं आयुष्य समृद्ध करणारं खूप मोलाचं काहीतरी देण्याची ताकदही यात असणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो.  विशेषत: ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य प्रेक्षकांनी मला लावलेला अतोनात जीव, हे माझं बळ आहे. एक अभिनेता म्हणून मला तुमचं प्रचंड प्रेम लाभलंय. चाहत्यांचं हे प्रेम सार्थ ठरावं यासाठी, या जगावेगळ्या मालिकेतली एक अफलातून भुमिका मी समरसून, तनमन अर्पून साकारण्याचा प्रयत्न करतोय”.

सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची ही मालिका टेलिव्हिजनवर सध्या सुरू असलेल्या मालिकांपेक्षा वेगळी मालिका ठरणार आहे. त्यामुळे सासू सुनांच्या भांडणांनी, कटकारस्थान पाहून वैतागला असाल तर नक्कीच ही मालिका तुमचं मनोरंजन करेल.

संबंधित बातम्या

या सिरीयलमध्ये टीआरपीच्या आहारी जाऊन खोटे ड्रामे भरले जाणार नाहीत. या सिरीयलमध्ये कथानकात पाणी घालून ते पसरट केले जाणार नाही. या सिरीयलच्या चित्रीकरणापासून दिग्दर्शनापर्यन्त आणि लेखनापासून अभिनयापर्यन्त सगळ्या गोष्टी, तुम्हाला एखादा दर्जेदार सिनेमा पहात असल्यासारखा आनंद देतील, असं स्वत: किरण माने यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या