JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / KGF 2 review: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार यशचा चित्रपट? काय आहे पब्लिक रिव्ह्यू

KGF 2 review: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार यशचा चित्रपट? काय आहे पब्लिक रिव्ह्यू

KGF 2 Review: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा केजीएफ-2 (KGF-2) हा दाक्षिणात्य चित्रपट आज (14 एप्रिल 22) प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा दुसरा भाग तब्बल साडेतीन वर्षांनंतर प्रदर्शित होऊनही फॅन्समध्ये अजूनही या मूव्हीची (KGF Chapter 2) तेवढीच क्रेझ आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 एप्रिल-   बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा केजीएफ-2 (KGF-2) हा दाक्षिणात्य चित्रपट आज (14 एप्रिल 22) प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा दुसरा भाग तब्बल साडेतीन वर्षांनंतर प्रदर्शित होऊनही फॅन्समध्ये अजूनही या मूव्हीची (KGF Chapter 2) तेवढीच क्रेझ आहे. पहिल्या भागात गरुडाला मारून केजीएफचा सम्राट झालेल्या रॉकी भाईसमोर (Rocky) आता पुढे आणखी मोठ्या अडचणी उभ्या राहणार आहेत हे तर ट्रेलरवरून (KGF 2 trailer) स्पष्ट झालं होतं. त्यामुळे या सर्व आव्हानांना तो कसा सामोरा जातो, आणि ‘दुनिया’ मिळवण्याच्या त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो का? हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागणार आहे. दरम्यान या मूव्हीचे रिव्ह्यूज (KGF 2 movie review) देखील समोर आले आहेत. प्लॉट- पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही प्रकाश राज (Prakash Raj) रॉकीच्या आयुष्याची कथा पुढे सांगत आहेत. गरुडाची हत्या केल्यानंतर कोलार गोल्ड फील्ड्सवर (KGF) आता रॉकीचं राज्य आहे. केजीएफमध्ये रॉकीने आपलं साम्राज्य उभे केलं आहे, आणि तेथील लोकांसाठी तो देवासमान झाला आहे. अर्थात, त्याच्या प्रगतीवर जळणारेही लोक आहेत. या सर्वांनी त्याला संपवण्यासाठी अधीराची (संजय दत्त) मदत मागितली आहे. तर दुसरीकडे देशाच्या पंतप्रधानदेखील (रविना टंडन) रॉकीची वाढती ताकद पाहून चिंतेत आहेत. म्हणजेच रॉकीला या मूव्हीमध्ये दोन मोठ्या आव्हानांचा सामना करायचा आहे. रॉकीची इमोशनल बाजू- रॉकिंग स्टार यश (Rocking Star Yash), संजय दत्त (Sanjay Dutt), रविना टंडन (Raveena Tondon) अशी तगडी स्टारकास्ट असणारा केजीएफ-2 हा फॅन्सच्या अपेक्षेप्रमाणेच दमदार असल्याचं रिव्ह्यूजमधून दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिव्ह्यूनुसार, केजीएफच्या दुसऱ्या भागात रॉकीची (यश) प्रगती अगदी वेगात दाखवली आहे. पहिल्या भागात ज्याप्रमाणे कॅरॅक्टर एस्टॅब्लिशमेंटला भरपूर वेळ दिला गेला होता, तसं करणं या भागात टाळण्यात आलं आहे. दुसऱ्या भागात भरपूर नवीन पात्रं कमी वेळेत मात्र तेवढ्याच प्रभावीपणे दाखवण्यात आली आहेत. या भागात रॉकीची इमोशनल (KGF chapter 2 review) बाजूही दाखवण्यात आली आहे. फ्लॅशबॅकमधील काही सीन, त्याची लव्ह स्टोरी अशा काही सीक्वेन्सेसमधून ती दिसून येते. इंडिया टुडेने या मूव्हीच्या प्लॉट एस्टॅब्लिशमेंटसाठी दिग्दर्शकाचं कौतुक केलं आहे. त्यांनी या मूव्हीला 3.5/5 रेटिंग दिलं आहे.

 तगडा अभिनय- संजय दत्तने साकारलेला अधीरा (Adheera), आणि रविना टंडनने साकारलेली पंतप्रधानांची भूमिका एकदमच उठून दिसते. अधीराच्या एन्ट्रीचा सीन रॉकीच्या एन्ट्री सीनला तोडीसतोड आहे. ही मूव्ही जेवढी डिरेक्टर प्रशांत नीलची (Prakash Neel) आहे, तेवढीच यश, संजय दत्त आणि रविनाचीही आहे. यासोबतच राव रमेश आणि प्रकाश राज यांनीही आपापल्या भूमिका अगदी प्रभावीपणे साकारल्या आहेत. अ‍ॅक्शन फॅन्ससाठी मेजवानी- केजीएफचे अ‍ॅक्शन सीक्वेन्स आणि पॉवरफुल डायलॉग्ज यांचा विशेष फॅनबेस आहे. केजीएफचा दुसरा भाग या फॅन्ससाठी अगदी मेजवानी (KGF Action Scenes) आहे. ट्रेलरमध्ये रॉकीचा डायलॉग आहे, ‘व्हॉयलन्स लाईक्स मी’. या डायलॉगला साजेसे अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस मूव्हीमध्ये आहेत. अधीरा आणि रॉकीचे डायलॉग, दोघांचे अ‍ॅक्शन सीन्स आणि जुगलबंदी पाहणं म्हणजे अ‍ॅक्शन मूव्ही फॅन्ससाठी पर्वणीच आहे. बॉलिवूड लाईफ वेबसाईटने दिलेल्या रिव्ह्यूनुसार, केजीएफ-2च्या अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये 80च्या दशकातील गँगस्टर मूव्हीजची झलक दिसते. अ‍ॅक्शन सीनसोबत मूव्हीमधील बॅकग्राऊंड म्युझिक, फ्रेमिंग आणि लायटिंगही जबरदस्त आहे.

तिसऱ्या भागाची उत्सुकता- इंडियन एक्स्प्रेसने आपल्या रिव्ह्यूमध्ये एका फॅनचं ट्विट दिलं आहे. या ट्विटमध्ये केजीएफ-2 च्या पोस्ट क्रेडिट सीनबाबत माहिती देण्यात आली आहे. पोस्ट क्रेडिट सीननुसार या मूव्हीचा तिसरा भागही (KGF Chapter 3) येतो आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आतापासूनच या मूव्हीच्या पुढच्या भागाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. बहुतांश वेळी चित्रपटाच्या पहिल्या भागाएवढा त्याचा सीक्वल प्रेक्षकांना रुचत नाही. मात्र, केजीएफ याला अपवाद ठरतो आहे. केजीएफचा पहिला भाग जेवढा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता, तेवढीच पसंती ते दुसऱ्या भागालाही दाखवतील अशी आशा आहे. त्यामुळेच बाहुबलीतील प्रभास, पुष्पातील अल्लू अर्जुन आणि आता केजीएफतील यश असे एकापाठोपाठ एक साऊथ सुपरस्टार प्रसिद्धीच्या बाबतीत बॉलिवूड स्टार्सना मागे टाकताना दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या