मुंबई 1 जुलै: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale arrest) च्या अटकेनंतर बरंच नाट्य घडलं होतं. या अभिनेत्रीला एका आक्षेपार्ह पोस्टमुळे तब्ब्ल 41 दिवस जेलमध्ये राहावं लागलं होत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या पोस्टमुळे तिच्यावर वीसहून अधिक FIR दर्ज करण्यात आल्या होत्या आणि तिला एका रात्रीत लगोलग पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तिच्यावर कारवाईत करण्यात आली होती. या सगळ्या घडामोडींमध्ये तिला अत्यंत भयानक पद्धतीने पोलीस स्टेनमध्ये नेण्यात आलं असं तिने News18 लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. केतकी (Ketaki Chitale arrested for posting against Sharad Pawar) चाळीस दिवसहून अधिक काळ जेलमध्ये होती. नुकताच तिचा जमीन मंजूर झाला आणि अखेर तिची सुटका करण्यात आली. केतकीने News18 लोकमत सोबत वार्तालाप करताना तिच्या एकेचाळीस दिवसांच्या प्रवासाबद्दल बरीच माहिती दिली आहे. केतकीला अत्यंत भीषण पद्धतीने पोलीस स्टेशनला नेण्यात आलं असं तिचं म्हणणं आहे. “माझ्या घरची थेट बेल वाजली, मला कोणतीही नोटीस न पाठवता मला स्टेटमेंट घेण्यासाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. वस्तुस्थितीमध्ये कायद्यानुसार व्यक्तीला स्टेटमेंट देण्यापूर्वी त्यांना किमान दोन दिवसाआधी नोटीस पाठवली जाते मला अर्धा तास आधी सुद्धा नोटीस आली नव्हती. थेट पोलीस दारात आले आणि त्यांनी मला उचलून घेऊन गेले. अटक होताना सुद्धा अरेस्ट वॉरंट नसताना मला अटक केली गेली. मला ताब्यात घेतल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बायकांची फौज माझ्या घराबाहेर आली होती. साधारण वीस-एक जणांची गर्दी बाहेर असताना मला गर्दीतून जोरात कानाखाली मारण्यात आली. माझ्या डोक्यात जोरात टपली मारण्यात आली. उजव्या बाजूला छातीला मुक्का बसला, धक्का देण्यात आला, पायात पाय घालून मला पाडण्याचा प्रयत्न झाला आणि त्याने मी पोलिसांच्या गाडीत पडले. पडलेली असताना माझे कपडे सुद्धा खेचण्यात आले. माझ्या साडीचा पदर खाली आला, साडी वर गेली होती, माझा विनयभंग होत होता हे घडत असताना माझ्यावर शाईफेक करण्यात आली. मला इथं हे स्पष्ट करायचं आहे की ती शाई नव्हती. केमिकल मिश्रित कला रंग माझ्यावर टाकण्यात आला आणि अंडी फेकण्यात आली. माझ्यासोबत पोलिसांवर सुद्धा मारण्यात आलं. आणि हा प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडत होता.” पोलिसांनी तिला कारवाई दरम्यान त्रास दिला नाही असं ती स्पष्ट करते. तिच्यावर जबरदस्ती झाली नाही, मारहाण झाली नाही असं सुद्धा ती सांगते.
या सगळ्या परिस्थिती केतकी हस्तानाचे अनेक फोटो viral झाले होते. त्याला अनेकांनी विक्षिप्त आणि वेडेपणाची कृती म्हणलं होतं. हे ही वाचा- Ketaki Chitale: माझ्यावर हल्ला करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते; बाहेर येताच केतकी चितळेची पहिली प्रतिक्रिया
त्यावर ती सांगते, “टीव्हीवर अत्यंत नाटकी पद्धतीने दाखवलं जातं की जेलमध्ये जाताना रडू आलं पाहिजे. माझ्यासोबत अनेक गोष्टी होत होत्या. मात्र माझ्यावर जेव्हा जेलमध्ये जायची वेळ आली मी विचार केला की अशा परिस्थितीला रडत सामोरं न जात हसत हसत सामोरं जावं. जे घडणार आहे ते रोखू शकत नाही आणि आपली बाजू चुकीची नाहीये तर हसत सामोरं जाणं केव्हाही उत्तम असा विचार मी केला.”