JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / केदार शिंदेंचा 'बाईपण' सगळ्यांवरच पडला 'भारी'! चित्रपटाने दणदणीत कमाई करत मोडला 'हा' रेकॉर्ड

केदार शिंदेंचा 'बाईपण' सगळ्यांवरच पडला 'भारी'! चित्रपटाने दणदणीत कमाई करत मोडला 'हा' रेकॉर्ड

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला आहे.

जाहिरात

'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिस कलेक्शन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 जुलै : सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचीच चलती आहे. मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आलेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण आदिपुरुषसारख्या बिग बजेट सिनेमाला दणकून पाडत मराठी सिनेमानं नाव कमावलं आहे. एकामागोमाग एक मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत. काही काळापूर्वी आलेल्या रावरंभा, महाराष्ट्र शाहीर या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण आता आलेल्या एका चित्रपटानं मात्र रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित  ‘बाईपण भारी देवा’. दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 30 जून रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपटाला   बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. नुकतंच या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला किती कमाई केली, याचा आकडा समोर आला आहे. केदार शिंदे यांनी एक पोस्ट करत चित्रपटाच्या कमाईविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करत या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला किती कमाई केली याची माहिती दिली आहे. मोठी स्टारकास्ट असलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला 6.45 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे. यानिमित्ताने केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत. ‘मिस्टर शाह तुम्ही कौतुकास पात्र आहात…’ हृता दुर्गुळेनं नवऱ्याचं ‘या’ कारणासाठी केलं अभिनंदन केदार शिंदे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला २१ वर्ष लागली दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! २००२ साली सही रे सही आलं. त्याला तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेली कित्येक वर्ष त्याचे “हाऊसफुल्ल” चे बोर्ड मी पाहातो आहे. त्यानंतर अनेक नाटकं, सिनेमे यालाही भरभरून प्रतिसाद दिलात. ते पुढे म्हणाले की, ‘अगं बाई अरेच्चा, जत्रा ते महाराष्ट्र शाहीर पर्यंतच्या प्रवासात तुमची साथ लाखमोलाची ठरली. मात्र खऱ्या अर्थाने “सही” नंतर “बाईपण भारी देवा” चं हे यश पाहातो आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन. तुम्ही मात्र सोबत राहा. खुप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन’ अशा भावना केदार शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला पहिल्या शो पासून प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात सगळीकडेच या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल सुरू आहेत. एवढंच नाही तर अनेक ठिकाणी खास महिलांसाठी अनेक शो आयोजित करण्यात येत आहेत. विशेष करून महिलांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. हेच चित्रपटाच्या दणदणीत कमाईमागचं कारण आहे. अजून हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या