अमिताभ बच्चन डाएट
मुंबई, 03 नोव्हेंबर: बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांआधीच त्यांनी 80वा वाढदिवस साजरा केला. वयाच्या 80व्या वर्षीही अमिताभ बच्चन फिट आहेत. त्यांचा उत्साह आजही पंचवीशीतील मुलासारखा असतो. आजही ते प्रत्येक सिनेमात तितकाच जिव तोडून काम करतात. बिग बींचा फिटनेस आणि त्यांच्या फॅशन सेन्सवर तरूण वर्ग आजही फिदा आहे. बिग बींची एनर्जी अफाट आहे. त्यांना कोणीच चॅलेंज देऊ शकत नाही असं अनेकांनी म्हटलं आहे. निरोगी आणि फ्रेश राहण्यासाठी बिग बी आजही योग्य डाएट फॉलो करतात. पण फिट होण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केलाय. त्यांचे आवडते पदार्थ त्यांना सोडावे लागलेत. बिग बींच्या फिटनेसचं सुपर सिक्रेट समोर आलं आहे. बिग बी सध्या कोन बनेगा करोडपती हा शो होस्ट करत आहेत. त्यांच्या अनोख्या शैलीनं त्यांनी अनेक वर्ष केसीबी शो सुरू ठेवला. शो दरम्यान ते समोरच्या स्पर्धकाला त्यांच्या स्टाइलमध्ये बोलत करतात. बोलता बोलता बिग बी त्यांच्या आयुष्यातील अनेक मजेशीर गोष्टीही शेअर करत असतात. हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकाशी बोलताना बिग बींनी त्यांच्या सिक्रेट डाएटविषयी सांगितलं. हेही वाचा - ‘कधी कधी वाटतं…’; KBC 14 स्पर्धकाचं पत्र पाहून BIG B यांनाही कोसळलं रडू केबीसीमध्ये बिग बींनी स्पर्धकाला त्याचा आवडता पदार्थ कोणता असं विचारलं. तेव्हा स्पर्धकानं म्हटलं, ‘जया जींना फिश आवडतात ना सर’. त्यावर बिग बी म्हणाले, ‘हो तिला फिश खूप आवडतात’. यावर स्पर्धकानं, ‘सर तुम्हालाही फिश आवडतात का?’, असं विचारलं. त्यावर बिग बी म्हणाले, ‘मी सोडलं. मी खूप गोष्टी सोडल्या. तरूण वयात सगळं काही करण्याची इच्छा होते. मी आता मांस खाणं सोडलं आहे. काही दिवसांपासून मी गोड खाणंही सोडलंय भातही खाणं सोडलं. जाऊदेत आता मी पुढे बोलत नाही’. बिग बींच्या या उत्तरानं सगळेच हसू लागले.
खेळात पुढे हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धक विद्या यांनी बिग बींना म्हटलं, ‘लोक इथे पैसे कमावण्यासाठी येतात पण मी इथे तुम्हाला भेटायला आली आहे’. यावर बिग बी म्हणाले, ‘तुम्हाला मला भेटायचंच होतं तर आपण दुसरीकडे कुठेतरी भेटलो असतो’. बिग बींच्या प्रश्नावर विद्या म्हणाल्या, ‘माझी 22 वर्षांची तपस्या आज पूर्ण झाली’.
बिग बींच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर बिग बी केबीसीचं शुटींग करून ‘ऊंचाई’ या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिधी आहेत. बिग बींच्या वाढदिवसाच्या दिवशीच ‘गुड बाय’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली.