JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अमिताभ बच्चन यांचं खरं नाव 'इन्कलाब'? बिग बींनी स्वतः सांगितलं सत्य

अमिताभ बच्चन यांचं खरं नाव 'इन्कलाब'? बिग बींनी स्वतः सांगितलं सत्य

‘तु इन्कलाबची एवढी समर्थक आहेस तर तुझ्या पोटात वाढत असलेलं बाळ जन्माला आलं की त्याचं नाव इन्कलाब ठेवलं जाईल.’ असं अमिताभ यांच्या आईला सांगण्यात आलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 ऑक्टोबर : अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा शो सध्या अधिकाधिक लोकप्रियता मिळवत आहे. या शो दरम्यान अमिताभ बच्चन फक्त स्पर्धकांना प्रश्नच विचारत नाही तर त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे अनुभव शेअर करायला लावतात. तसेच स्वतःचेही अनुभव प्रेक्षकांची शेअर करतात. आपल्या खासगी जीवनाशी संबंधित एक खास किस्सा बिग बींनी केबीसीच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये शेअर केला. आज पर्यंत अमिताभ यांच्या खऱ्या नावाविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कौन बनेगा करोडपती शो दरम्यान अमिताभ यांनी एका स्पर्धकाचा हा संभ्रम दूर केला आणि त्यांच्या खऱ्या नावाविषयीचा किस्सा देखील प्रेक्षकांशी शेअर केला. हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानं अमिताभ यांना विचारलं की, त्यांचं पूर्वीचं नाव इन्कलाब होत का? त्यावेळी अमिताभ यांनी या नावामागची एक इंटरेस्टिंग कहाणी सांगितली. शाहरुख खानसोबत सिनेमात कधी दिसणार मुलगा अबराम, ट्वीटरवर केला खुलासा अमिताभ म्हणाले, माझा जन्म 1942 मध्ये झाला. त्यावेळी गांधींजींचं ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू होतं. आमच्या शहरात आंदोलन सुरू होतं आणि लोक रस्त्यावर उतरुन ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनानं प्रभावित होती अमिताभ यांची आई देशात 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू होतं आणि संपूर्ण भारत देश इंग्रजांना देशातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होता. यावरुन आपल्या नावाविषयीचा खुलासा करताना अमिताभ म्हणाले, माझी आई तेजी बच्चन या आंदोलनान प्रचंड प्रभावित झाली होती. त्यांनी एक दिवस मोर्चा पाहिला आणि त्यांच्यासोबत निघून गेली. मी त्यावेळी आईच्या पोटात होतो आणि ती आठ महिन्यांची गर्भवती होती. रेमो डिसूझाच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, वरुण धवन म्हणतो… या घटनेनं पसरला गैरसमज जेव्हा ही घटना घडली त्यावेळी घरातील सर्व लोक अमिताभ यांच्या आईला शोधायला लागले. ज्यावेळी ती सापडली तेव्हा सर्वांनी तिला असं केल्याबद्दल चांगलाच दम भरला आणि म्हटलं की तु इन्कलाबची एवढी समर्थक आहेस तर तुझ्या पोटात वाढत असलेलं बाळ जन्माला आलं की त्याचं नाव इन्कलाब ठेवलं जाईल. ही गोष्ट अनेकांना माहित आहे त्यामुळे सर्वांना वाटतं की माझ्या जन्मानंतर खरंच माझं नाव इन्कलाब ठेवण्यात आलं होतं आणि माझं खरं नाव इन्कलाब आहे. सुमित्रानंदन पंत यांनी ठेवलं ‘अमिताभ’ हे नाव अमिताभ बच्चन यांनी सांगितलं, लोकांना वाटतं असं काहीही नाही, माझे वडील हरिवंशराय बच्चन यांचे एक जवळचे मित्र माझ्या जन्माच्यावेळी घरी आले होते. जेव्हा त्यांनी नवजात बाळाला पाहिलं तसं त्यांनी लगेचच त्याचं नाव अमिताभ ठेवलं. यानंतर अमिताभ यांनी खुलासा केला की, त्यांचं इतर कोणतीही दुसरं नाव नाही. मिलिंद-अंकिताचं लडाखमध्ये रोमँटिक व्हेकेशन, व्हायरल झाला KISSING VIDEO ==================================================================== मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस, हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या