मुंबई, 1 नोव्हेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती हा क्विज शो होस्ट करत आहेत. यासोबत ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांच्या ट्विटरवरुन शो संबंधित अपडेट्स आणि ट्वीस्टबद्दल माहिती देत असतात. पण नुकतंच त्यांनी केबीसीच्या सेटवर आलेल्या नव्या पाहुण्याचे फोटो स्वतःच्या ट्विटर हॅन्डलवरुन शेअर केले आहेत. हा नवा पाहुणा दुसरं तिसरं कोणी नसून एक मांजर आहे. अमिताभ यांनी शेअर केलेले या मांजरीचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. हे फोटो शेअर करतना अमिताभ बच्चन यांनी एक कविताही लिहिली आहे. जी वाचवल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. अमिताभ यांनी लिहिलं, ‘ऐ बिलौरी, बिल्ली बिल्ली, खेलन चली KBC,जैसे आइ Fastest Finger, लोट पोट हो गयी वहीं’. …म्हणून जॅकी श्रॉफनं अनिल कुमारच्या 17 वेळा कानशीलात लगावली!
अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटनंतर त्यांच्या फॉलोअर्स आणि चाहत्यांनी या फोटोंवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, अमितजी तुम्ही जगातल्या कोणत्याही गोष्टीला आकर्षित करू शकता. हॉट सीटकडे जाताना ती खूप फेमस झाली आहे. सेल्फी विथ अमितजी. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ही आत कशी आली. हिने तर ऑडिशनही दिली नव्हती. तर आणखी एका युजरनं लिहिलं, बिग बींची पर्सनॅलिटीच अशी आहे जी सर्वांना आकर्षित करते. ‘ती अजूनही माझ्या कवेत आहे’, विवेकच्या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती धमकी अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला फोटो असो वा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होतो. अमिताभ बच्चनचे सिनेमा सुद्धा लवकरच बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवणार आहेत. ज्यात ‘गुलाबो-सिताबो’, ‘झुंड’, ‘चेहरे’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमांचा समावेश आहे. KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच ‘कम्प्यूटर जीं’वर उठला सवाल, वाचा नक्की काय झालं ==============================================================