JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kavita Medhekar: कविता लाड यांना नाटकाच्या शेवटच्या एंट्री आधी का आलं रडू?

Kavita Medhekar: कविता लाड यांना नाटकाच्या शेवटच्या एंट्री आधी का आलं रडू?

अजिबातच नाटकाशी गंध नसलेल्या पण आत्ताच्या घडीला मराठी नाटकात ज्यांचं नाव न घेता लिस्ट पुरी होऊ शकत नाही असं यश मिळवणाऱ्या अभिनेत्री (Kavita Medhekar) कविता लाड-मेढेकर यांचा हा नाटकाच्या एंट्रीचा अनसीन किस्सा तुम्हाला माहित आहे का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई 19 जून:**मराठी नाटकांमध्ये विशेष छाप उमटवलेलं एक नाव म्हणजे (Kavita Lad-Medhekar) कविता लाड-मेढेकर. कविता लाड या चेहऱ्याने मराठी नाटकांत अशी काही कमालीची जादू केली की प्रेक्षक दंग होऊन गेले. कविता लाड गेले अनेक वर्ष मालिका, मराठी नाटक यातून आपल्यासमोर येत आहेत. अभिनयात एकदम सरस असणाऱ्या या अभिनेत्रीच्या एका प्रसिद्ध नाटक (Eka Lagnachi Pudhachi Goshta) ‘एका लगाची पुढची गोष्ट’ चे काहीच दिवसापूर्वी 500 प्रयोग पूर्ण झाले. एकदा नाटकाच्या एका एंट्रीच्या वेळी कविता लाड यांना भडभडून आलं होतं हे तुम्हाला माहीत आहे का? ‘एका लग्नाची गोष्ट’ (Eka Lagnachi Goshta)हे कविता लाड आणि प्रशांत दामले (Prashant Damle) यांचं सुप्रसिद्ध नाटक. या नाटकाचे जवळपास 800 हुन अधिक प्रयोग झाले. या नाटकाने सगळ्या महाराष्ट्रालाच वेड लावलं. यातील ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाण्याचे आजही अनेक चाहते आहेत. याच नाटकाशी संबंनधत आठवणी कविता यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केल्या आहेत. सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात नुकतीच कविता यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांचा एकूण प्रवास जाणून घेत असताना एका लगाची गोष्ट नाटकाचा विषय निघाला. तेव्हा एक आठवण सांगताना कविता म्हणल्या, “एका लग्नाची गोष्ट हे नाटक तेव्हा सुपरहिट होतं. त्या नाटकाचे आम्ही जवळपास 836 प्रयोग सादर केले. पण माझ्या मुलाच्यावेळी गरोदर असताना मी नाटकांतून बाहेर पडायचा निर्णय घेतला. आता तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं म्हणून थांबायचं मी ठरवलं होतं. पण त्या नाटकाचा माझा शेवटचा प्रयोग आणि शेवटची एंट्री यायच्या काही क्षण आधी मला अचानक जाणवलं की हा माझा शेवटचा प्रयोग आहे, माझी ही शेवटची एंट्री आहे आणि यापुढे मी परत कधी येईन हे सांगता येत नाही. असं हळूहळू मला प्रत्येक डायलॉग्जबद्दल वाटू लागलं आणि ते माझ्या को-ऍक्टर्सना जाणवलं. अर्थात मी माझ्या आनंदासाठीच थांबणार होते, ब्रेक घेणार होते पण तरीही मला ते इतकं प्रकर्षाने जाणवलं की नाटक संपल्यावर मी धाय मोकलून रडले.”

यायचाच उलट त्या अजून एक आठवण सांगतात, “पण याचाच एक सुखद प्रसंग म्हणजे जेव्हा तब्ब्ल अठरा वर्षांनी मी एका लग्नाची पुढची गोष्ट करायला घेतलं तेव्हा शुभारंभाच्या प्रयोगाआधी मला प्रचंड भीती वाटत होती. हे ही वाचाBox office clash: बॉलिवूडमध्ये एक दोन नाही तब्ब्ल 15 पेक्षा जास्त फिल्मची होणार घमासान टक्क र मला प्रेक्षक स्वीकारतील का? मला जमेल का अशी भीती होती पण पडदा उघडल्यावर जो काही रिस्पॉन्स मिळाला ते पाहून मला अगदी आपलंस वाटलं. सगळे माझ्याचसाठी आलेत असं वाटलं आणि मी प्रयोग केला.” कविता लाड या अतिशय अपघाताने या इंडस्ट्रीत आल्या आहेत. त्यांचं उत्तम काम आणि नशीब या दोघांच्या जोरावर त्यांना आजपर्यंत कायमच यश आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या