JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / हॉट सीटवर बसून KBC खेळण्याऐवजी पतीशी भांडू लागली स्पर्धक, वाचा नक्की काय झालं

हॉट सीटवर बसून KBC खेळण्याऐवजी पतीशी भांडू लागली स्पर्धक, वाचा नक्की काय झालं

कौन बनेगा करोडपतीचा 30 सप्टेंबरचा एपिसोड खूपच विचित्र राहिला. या एपिसोडमध्ये आलेली एक स्पर्धक KBC खेळण्याऐवजी चक्क तिच्या नवऱ्यासोबत भांडायला लागली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 ऑक्टोबर : सध्या कौन बनेगा करोडपती हा टीव्ही शो आधिकाधिक लोकप्रिय ठरत आहे. मनोरंजानासोबतच महत्त्वपूर्ण माहितीच स्रोत म्हणून या शोकडे पाहिलं जातं. मात्र 30सप्टेंबरला प्रसारित केला गेलेला एपिसोड थोडा विचित्र राहिला. उत्तराखंडच्या ऋषिकेशमधून आलेल्या शिवानी ढिंगरा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसल्या खऱ्या पण KBC खेळण्याऐवजी त्यांनी चक्क शो सुरू असतानाच पतीशी भांडायला सुरुवात केली. हॉट सीटवर बसल्या बसल्याच शिवानी यांनी त्याच्या नवऱ्याबद्दल असेलेल्या तक्रारींची यादी अमिताभ बच्चन यांच्या हातात दिली. शिवानी अद्याप हॉट सीटवर टिकून आहे. मात्र त्यांनी शोमध्ये आल्यावर पतीच्या तक्रारींची दिलेली यादी पाहून स्वतः अमिताभ बच्चन सुद्धा चक्रावले आणि विशेष म्हणजे शिवानी यांनी ही यादी एका  पेपरवर लिहून आणली होती. ‘ही’ व्यक्ती आहे शाहरुख खानची कार्बन कॉपी, PHOTO पाहून तुम्ही व्हाल थक्क! शिवानी यांनी ही यादी बिग बींच्या हातात दिली आणि याबद्दल मला बोलयंच आहे असं त्यांनी बिग बींना सांगितलं. एवढंच नाही तर अमिताभ यांच्यासमोरच त्यांनी पतीशी भांडायला सुरुवात केली. मात्र त्यांचं हे भांडण खऱ्याखुऱ्या भांडणात बदललं नाही. शिवानी यांचा स्वभावनं खूप गोड आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या तक्रारी सुद्धा खूपच गोड अंदाजात मांडल्या. पण त्याच्यात अशा गोष्टींवरून भांडणं झाली की अमिताभ यांनी बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. शिवानी यांचे पती एक बँक कर्मचारी आहेत. ते सकाळी कामाला जातात आणि संध्याकाळी घरी येतात. या व्यतिरिक्त जेव्हा ते घरी असतात त्यावेळी ते त्यांच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर बीझी असतात. त्यांनी आतापर्यंत शिवानीला कँडल लाईट डिनरला नेलेलं नाही किंवा गुलाबाचं फुलही दिलेलं नाही. दरम्यान आतापर्यंत झालेल्या खेळात शिवानी यांनी 80 हजार जिंकले आहेत. Bigg Boss मुळे होणार सलमान खानचं मोठं नुकसान, काय आहे यामागचं कारण? शिवानी यांनी विचारण्यात आलेले प्रश्न- प्रश्न : NALCO एक नवरत्न कंपनी आहे, यातील A चा अर्थ काय आहे? उत्तर : अॅल्यूमिनियम प्रश्न : महाभारतात गांधरराजपुत्र, सौबल आणि सुबलपुत्र कोणाला म्हटलं जातं ? उत्तर : शकुनी प्रश्न : मिठाइतील कोणती अशी जोडी आहे जी तयार करण्यासाठी दूधाचा वापर केला जातो? उत्तर : कलाकंद प्रश्न : यातील काय लॉन टेनिसचा स्कोर दाखवत नाही? उत्तर : 45-0 प्रश्न : कोणत्या भाजीच्या नावावर एका फळाचं नाव नाही आहे? उत्तर : अमरुद प्रश्न : पारंपरिक पद्धतीनं सामान्यपणे म्यानात काय ठेवलं जात? उत्तर : तलवार कतरिनाच सलमानचं खरं प्रेम, Bigg Boss 13च्या ग्रँड प्रीमियरमध्ये सापडला पुरावा! ======================================================= VIDEO: प्रकाश आंबेडकर आज उमेदवारांची यादी जाहीर करणार? इतर टॉप 18 बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या