Kaun Banega Crorepati
मुंबई, 15 सप्टेंबर : टेलिव्हिजनचा सर्वात प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीचा 14 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरवेळेस प्रमाणे याही सिझनला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. छोट्या पडद्यावरून अनेक रिअॅलिटी शो प्रसारित होत असतात. हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत आहेच शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला वाव देत आहेत. बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन सादर करत असलेल्या या शोची प्रचंड लोकप्रियता आहे. या आठवड्यात दोन जुळे भाऊ या शोमध्ये दिसणार आहेत. हे दोघे जण एवढे एकसारखे दिसतात कि त्यांना पाहून खुद्द अमिताभ बच्चनही आश्चर्यचकित होतात. या जुळ्या भावांमुळे अनेक गमतीजमती सेटवर घडतात. KBC 14 च्या प्रत्येक एपिसोडमध्ये दिसणारे स्पर्धक खूप मजेशीर आणि उत्साही आहेत. त्यामुळेच या मंचावर अनेक मजेशीर प्रकार घडताना दिसून येतात. या शो मध्ये सहभागी अनेक स्पर्धक हा गेम अतिशय मनोरंजक पद्धतीने खेळतात पण त्यासोबतच लखपती बनून बाहेर पडतात. या शो मध्ये अनेक गमतीदार किस्से घडतात. अमिताभ सुद्धा या शोचा मनसोक्त आनंद घेताना दिसतात. नुकताच शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. केबीसी मध्ये या आठवड्यात सेटवर दोन जुळे भाऊ सामील झाले आहेत. एक भाऊ अनुराग कुमार अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसला आहे आणि मोठा भाऊ अनूप प्रेक्षकांमध्ये आहे. दोघांचे चेहरे अगदी जुळतात आणि त्यानंतर ते बिग बींना त्यांच्या खोडसाळपणाची माहिती देतात.
तो सांगतो की, कधीकधी त्याला पाहून त्याची आईही फसते, त्याचवेळी तो दुसऱ्याच्या फोनचे फेस लॉकही चेहऱ्याने उघडतो, त्यामुळे त्याने फेस लॉक लावणे बंद केले आहे. हे ऐकून अमिताभ बच्चन चकित झाले आणि ब्रेकच्या वेळी दोन्ही भावांनी आपली जागा बदलू नये म्हणून त्यांना टेन्शन येते. त्यामुळे बिग बी असा मार्ग काढतात, ज्याला पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हेही वाचा - Milind Gawali : ‘त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि…’; मिलिंद गवळींनी शेअर केला पडद्यामागचा ‘तो’ किस्सा अमिताभ बच्चन हॉट सीटवर बसलेल्या धाकट्या भावाला हातात पेन घेऊन ऑटोग्राफ देतात जेणेकरून स्पर्धकाची ओळख कायम राहावी आणि त्यांनी आपली जागा बदलू नये. हे सगळं गमतीत घडलं असलं तरी या सगळ्या प्रसंगामुळे प्रेक्षकांमध्ये चांगलाच हशा पिकला.
आता गेम खेळणारा स्पर्धक आणि सोबत आलेला त्याचा जुळा भाऊ या दोघांची ओळख पटण्यासाठी बिग बींनी ही अनोखी शक्कल लढवली आहे . शोचा हा लेटेस्ट प्रोमो सध्या खूप पसंत केला जात आहे. कौन बनेगा करोडपतीचा हा प्रोमो म्हणजेच KBC सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे.