JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Mahesh Kale: कॉन्सर्टमध्ये रोजा जानेमन गायलं अन...; 'त्या' व्हिडीओमुळे महेश काळे सोशल मीडियावर तुफान ट्रोल

Mahesh Kale: कॉन्सर्टमध्ये रोजा जानेमन गायलं अन...; 'त्या' व्हिडीओमुळे महेश काळे सोशल मीडियावर तुफान ट्रोल

सध्या महेश काळे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे त्यांना ट्रोल केलं जात आहे. एवढंच नाही तर त्यांच्यावर मिम्स देखील बनवले जातायत. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.

जाहिरात

महेश काळे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,29 मार्च:   भारतात शास्त्रीय संगीतातील मोठं नाव म्हणजे प्रसिद्ध गायक महेश काळे. महेश काळेंना त्यांचा पहिलाच चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’ मधील गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आज त्यांच्यामुळे तरुणाईला भारताच्या अभिजात शास्त्रीय संगीताची नव्यानं ओळख होत आहे. या गायकाचे आज अनेक चाहते आहेत. त्यांच्या गायकीचे आज अनेक जण दिवाने आहेत. पण सध्या महेश काळे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे त्यांना ट्रोल केलं जात आहे. एवढंच नाही तर त्यांच्यावर मिम्स देखील बनवले जातायत. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत महेश काळे ‘रोजा जानेमन’ हे गाणं गाताना दिसत आहेत. मात्र व्हिडिओच्या शेवटी एका कडव्यानंतर ते शब्दांच्या पलिकडले हे गाणं गाताना दिसतात. फक्त तेच नाही तर उपस्थित श्रोते देखील हे गाणं त्यांच्यासोबत गातात. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. नेटकऱ्यांना मात्र त्यांनी ‘रोजा जानेमन’ या गाण्याचा केलेला शेवट काही भावलेला दिसत नाही. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत ट्रोल केलं आहे. Aai Kuthe Kay Karte: गौरी निघून गेल्यावर वाईट झालीये यशची अवस्था; खचलेल्या लेकाला कसं बाहेर काढणार आई? ‘रोजा जानेमन’ या गाण्याला ए आर रहमान यांचं संगीत आहे. त्यावरून अनेक मिम्स बनवण्यात येत आहेत. एका मिम मध्ये ए आर रहमान यांचा फोटो लावून ‘ओ महेश जी रमजान सुरु झालाय, रोजाची वाट लावू नका’ अशा आशयाच्या मिम्स बनवल्या आहेत. तर त्यांच्या या व्हिडिओवर, ‘दोन गाणी एकत्र का गेली, ‘याची काय गरज होती’ असं म्हणत नेटकऱ्यांनी महेश काळे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. पण याचवेळी अनेक चाहते त्यांचं कौतुक देखील करत आहेत.

महेश काळे यांचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात,  ते पंजाब मध्ये अमराठी रसिकांसमोर ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हे गाणं गाताना दिसत आहेत. तेव्हा कार्यक्रमांच्या शेवटी श्रोत्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण देखील केली. मराठी भाषेतील कलाकृतींचा संपूर्ण भारतात आनंद घेतला जातो…असं म्हणत नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून कौतुक केलं आहे. या गाण्यांच्या फ्युजन बद्दल सांगताना महेश काळे यांनी ‘त्याचा हेतू इतकाच आहे की आजच्या पिढीला शास्त्रीय गाण्याकडं वळवण्यासाठी त्यांच्या कलानं घ्यावं म्हणून मी फ्युजन करतो’ असं मत व्यक्त केलं होतं. त्यांचा हा प्रयत्न काहींना भावला तर काहींना खटकला आहे.

महेश काळे आजकाल सोशल मीडियावर चांगलेच अँक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे. महेश काळे हे भारताबाहेर राहूनसुद्धा शास्त्रीय संगीटाच प्रसार मोठ्या प्रमाणात करतात. प्रदेशातील मुलांसाठी त्यांची सनफ्रान्सिस्को येथे खास संगीत अकादमी आहे. त्याद्वारे आपलं पिढीजात शास्त्रीय संगीताचा वारसा ते परदेशातील मुलांना देखील देत आहे. या वरून चाहते त्यांचं नेहमीच कौतुक करत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या