JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन Katrina -Vicky सोबत करणार नाही साजरा, सलमान आहे कारण?

लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन Katrina -Vicky सोबत करणार नाही साजरा, सलमान आहे कारण?

कतरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina and Vicky) लग्नानंतर प्रत्येक सण एकत्र साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आता लग्नानंतर हे क्यूट कपल पहिला व्हॅलेंटाइन एकत्र साजरा करू शकणार नाहीत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 फेब्रुवारी: बॉलिवूडमधील ट्रेंडिंग कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina  and Vicky)  लग्नानंतर प्रत्येक सण एकत्र साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आता लग्नानंतर हे क्यूट कपल पहिला व्हॅलेंटाइन (valentine day ) एकत्र साजरा करू शकणार नाहीत. टायगर 3 च्या शेवटच्या शेड्यूलमध्ये व्यस्थ आहे कतरिना कैफ कतरिना सध्या तिच्या आगामी टायगर 3 या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्थ आहे. यामुळे ती लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन नवरा विकी कौशल याच्यासोबत साजरा करू शकणार नाही. सलमान आणि कतरिनाच्या आगामी टायगर 3 या सिनेमाच्या शेवटच्या शेड्यूलचे जानेवारीत चित्रीकरण होणार होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रसार पाहता चित्रीकरण थांबवण्याचा विचार केला. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रीकरणाचे नवीन शेड्यूल तयार केले आहे. फेब्रुवारीच्या मधल्या काळात सिनेमाची शुटिंग करण्याची योजना आखत आहेत. 15 दिवसाचे शेड्यूल असणार आहे. वाचा- VIDEO: श्वेता तिवारीची मुलगी Palak Tiwari वरुण धवनसह दिसणार बड्या प्रोजेक्टमध्ये दिल्लीत शुट केले जात आहेत अॅक्शन सीन्स चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा यांची इच्छा आहे की, या सिनेमातील अॅक्शन सीन्स दिल्लीच्या रस्त्यावर चित्रीत व्हावे. सलमान दिल्लीच्या काही ऐतिहासिक ठिकाणी हे सीन्स चित्रीत केले जावे. ज्यामध्ये लाल किल्ल्याजवळीच ठिकाणाचा समावेश आहे. सिनेमाची टीम कोरोना नियमांचे सर्व पालन करूनच हे चित्रीकरण केले जाणार आहे. सलमान आणि कतरिना 12 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत पोहचण्याची शक्यता आहे. 14 फेब्रुवारीपासुन चित्रीकरणाला सुरूवात करण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

चर्चा अशी देखील आहे की, 15 दिवसाच्या या शेड्यूलमध्ये सलमान खान सिनेमाचे चित्रीकरण 5 फेब्रुवारीपासून सुरू करणार आहे. मुंबईतील स्टुजिओत confrontation सीन्सचे चित्रीकरण करणार आहे. यामध्ये कतरिना कैफ दिसणार नाही. या सिनेमाची चाहते अतुरतेने वाट पाहत आहे. इमरान हाशमी या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. पहिल्यांदाच सलमान आणि इमरान हाशमी एकत्र काम करताना दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या