JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / फिल्मी जगताशी नव्हता संबंध तेव्हा अशी दिसत होती लोकप्रिय अभिनेत्री, बर्थडे गर्लला ओळखलं का?

फिल्मी जगताशी नव्हता संबंध तेव्हा अशी दिसत होती लोकप्रिय अभिनेत्री, बर्थडे गर्लला ओळखलं का?

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या थेट परदेशातून येऊन प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवताना दिसतात. बॉलिवूडमध्ये अशीच एक अभिनेत्री आहे, जी तरूणाईच्या गळ्यातील ताईत तर आहेच पण तिनं शाहरूख, आमिर आणि सलमान या तिन्ही खान मंडळीसोबत काम केलं आहे.

जाहिरात

फिल्मी जगताशी नव्हता संबंध तेव्हा अशी दिसत होती लोकप्रिय अभिनेत्री

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै- बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या थेट परदेशातून येऊन प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवताना दिसतात. बॉलिवूडमध्ये अशीच एक अभिनेत्री आहे, जी तरूणाईच्या गळ्यातील ताईत तर आहेच पण तिनं शाहरूख, आमिर आणि सलमान या तिन्ही खान मंडळीसोबत काम केलं आहे. शिवाय तिची अक्षय कुमारसोबत तर आतापर्यंतची सर्वात सुपरहिट जोडी राहिली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून कतरिना कैफ आहे. मागच्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री बॉलिवूडवर आधिराज्य गाजवताना दिसत आहे. प्रत्येक निर्मात्याला तिच्यासोबत काम करायची आहे,म्हणून तर ती अनेक निर्मात्यांची पहिली पसंत आहे.आज कतरिना तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज यानिमित्तच आपण ती बालपणी कशी दिसत होती,याची एक झलक पाहणार आहे. कतरिनानचं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाचा- प्रभासचं नाहीतर आमिर देखील नाही मोडू शकला शाहरूखचं एक रेकॉर्ड ; जगभरात झाली… या फोटोमध्ये कतरिना कैफ बकरीसोबत खेळताना दिसत आहे. कतरिनाने हा फोटो खूप आधी शेअर केला होता, ज्यामध्ये कतरिनाचे ओव्हरसाईज कपड्यांबद्दलचे प्रेमही दिसत आहे. प्रवासात किंवा आउटिंग दरम्यान अभिनेत्री बर्‍याचदा मोठ्या आकाराच्या हुडीज किंवा टी-शर्टमध्ये दिसते. त्याचप्रमाणे, या फोटोमध्येही ती एका मोठ्या आकाराच्या डेनिम जॅकेटमध्ये दिसत आहे. फोटो पाहिल्या पाहिल्या कतरिनाला ओळखता येत नाही, पण थोडावेळ निरखून पाहिल्यानंतर ती कतरिना असल्याचे कळते.

संबंधित बातम्या

आज कतरिनाची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. पण, जेव्हा तिने इंडस्ट्रीत पदार्पण केले तेव्हा तिला खूप टीकेलाही सामोरे जावे लागले. एक काळ असा होता, जेव्हा कतरिना ऑडिशनसाठी जायची तेव्हा तिच्या पदरी फक्त निराशाच यायची. कतरिनाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, जे तिच्या अभिनयातून आणि नृत्यातून स्पष्टपणे दिसून येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या