JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Katrina Kaif Pregnancy: कतरिना-विकी बनणार आईबाबा? 'कॉफी विथ करण'मध्ये गुड न्यूज देण्याची शक्यता

Katrina Kaif Pregnancy: कतरिना-विकी बनणार आईबाबा? 'कॉफी विथ करण'मध्ये गुड न्यूज देण्याची शक्यता

सध्या एकापाठोपाठ एक बॉलिवूड अभिनेत्री आपल्या प्रेग्नेन्सीची गोड बातमी देत आहेत. सोनम कपूर, आलिया भट्ट आणि बिपाशा बसूनंतर आता सर्वांचं लक्ष अभिनेत्री कतरिना कैफकडे लागलं आहे.

जाहिरात

या प्रकारानंतर विकी कौशलने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑगस्ट-   सध्या एकापाठोपाठ एक बॉलिवूड अभिनेत्री आपल्या प्रेग्नेन्सीची गोड बातमी देत आहेत. सोनम कपूर, आलिया भट्ट आणि बिपाशा बसूनंतर आता सर्वांचं लक्ष अभिनेत्री कतरिना कैफकडे लागलं आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नाला जवळपास 6 महिने पूर्ण झाले आहेत. अशातच अभिनेत्री प्रेग्नन्ट असल्याच्या बातम्या सतत समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कतरिनाने या सर्व बातम्या अफवा असल्याचं सांगत फेटाळून लावल्या होत्या. त्यांनतर आता एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. पाहूया काय आहे हा रिपोर्ट. कतरिना कैफ आपल्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आली होती. त्यांनतर आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सतत अभिनेत्री ओव्हरसाईज्ड ड्रेसमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अभिनेत्री प्रेग्नेंट असून  बम्प लपवण्यासाठी हे करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. महिन्यामध्येसुद्धा असंच काहीसं झालं होतं. पण त्यांनतर अभिनेत्रीने या सर्व निव्वळ अफवा असल्याचं सांगत विषयाला पूर्णविराम लावला होता. पण तरीसुद्धा सतत अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या समोर येत आहेत. याआधी सोनम कपूर, आलिया भट्ट आणि आता बिपाशा बसूनेसुद्धा आई बनणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे आता चाहत्यांचं लक्ष कतरिना कैफकडे लागून आहे. दरम्यान बॉलिवूड लाईफने एक नवा रिपोर्ट शेअर केला आहे. या रिपोर्टनुसार, अभिनेत्री प्रेग्नेंट असून ती ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये आपल्या प्रेग्नेंसीचा खुलासा शक्यता आहे. कारण करण जोहर आणि हा शो अभिनेत्रीसाठी फारच खास आहे. याच शोमधून विकी आणि कतरिनाची लव्हस्टोरी सुरु झाली होती असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीय. कतरिना कैफ आणि विकी कौशल या दोघांनाही आपल्या खाजगी गोष्टीवर कॅमेऱ्यासमोर चर्चा करणं पसंत नाहीय. त्यामुळे त्यांनी लग्नसुद्धा अत्यंत खाजगी पद्धतीने केलं होतं. परंतु या शोमध्ये अभिनेत्री गुड न्यूज देऊ शकते. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. (हे वाचा: Koffee With Karan 7: कतरिनाच्या लग्नाआधी करण-आलियाने नशेत विकीसोबत केलं होतं असं काही…ऐकून सर्वच चकित ) विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचं लग्न प्रचंड चर्चेत आलं होतं. या दोघांनी लग्नाची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. परंतु मीडियाला याची भनक लागली होती. या दोघांनी कडेकोट बंदोबस्तात आपलं लग्न उरकलं होतं. कतरिना आणि विकीचं लग्न 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे झालं होतं. दोघांनी आपलं लग्न अत्यंत खाजगी पद्धतीने उरकलं होतं. या दोघांच्या लग्नाला काही जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या