JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘सूर्यवंशी’च्या टीमसोबत 'हा' गेम खेळत होती कतरिना, अखेरच्या क्षणी अक्षयनं पलटवली बाजी

‘सूर्यवंशी’च्या टीमसोबत 'हा' गेम खेळत होती कतरिना, अखेरच्या क्षणी अक्षयनं पलटवली बाजी

कतरिना कैफचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 मार्च : अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ लवकरच ‘सूर्यवंशी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या दोघांच्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. कारण बऱ्याच वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अशातच कतरिना आणि अक्षयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात कतरिना सूर्यवंशीच्या टीमसोबत ‘डॉग अँड बोन’ हा गेम खेळताना दिसत आहे. पण अखेरच्या क्षणी अक्षय कुमार असं काही करतो की पूर्ण गेमच बदलून जातो. कतरिना कैफचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ‘डॉग अँड बोन’ हा गेम खेळत असताना संपूर्ण टीम कतरिनाला चिअर करताना दिसत आहे. पण अचानक या गेममध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की ज्यामुळे कतरिना आता हरणार असं सर्वांना वाटू लागतं. अशात अक्षय कुमार तिच्या मदतीला धावून येतो. अक्षय तिला इशारा करून या गेमची स्टॅटेजी समजावतो. ज्यामुळे क्षणातच कतरिना जिंकते. कतरिना जिंकल्यावर अक्षय काहीशा वेगळ्या प्रकारे रिअ‍ॅक्ट करतो. ज्यावर कतरिना हसते आणि त्याला हे असं रिअ‍ॅक्ट करणं बंद कर असं त्याला सांगते. विवाहित असूनही अनुपम खेर पुन्हा पडले होते ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात!

कतरिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘आजच्या दिवसाचा खेळ संपला.’ तिनं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. काहींनी कतरिनाचं कौतुक केलं आहे तर काहींनी मात्र अक्षयला गेम चेंजर म्हणत कतरिनाच्या जिंकण्याचं श्रेय त्याला दिलं आहे. आता फ्रीमध्ये पाहू शकता ‘तान्हाजी’, कसं? इथे वाचा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा 24 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अक्षय आणि कतरिना व्यतिरिक्त ‘सिंघम’ अजय देवगण आणि ‘सिंबा’ रणवीर सिंह सुद्धा दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. Birthday Special : अनुपम खेर करणार होते अर्चना पुरणसिंहला KISS, पण…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या