मुंबई, 06 फेब्रुवारी : सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे सध्या बी टाऊनमधलं सर्वाधिक चर्चेत असणारं कपल आहे. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर आपल्याला येत्या 14 फेब्रुवारीला लव्ह आजकलमध्ये पाहायला मिळाणारच आहे. पण हे दोघं सिनेमाच्या रिलीज अगोदर त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहेत. की काळापूर्वी हे दोघं रिलेशनशिपमध्ये असलेल्याच्या चर्चा झाल्या त्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही समोर आलं. या दोघांनी यावर प्रतिक्रिया कधीच दिली नाही मात्र नुकतंच एका रिअलिटी शोमध्ये कर्तिक पहिल्यांदाच ब्रेकअपवर बोलला आणि त्याची प्रतिक्रिया ऐकून स्वतः साराला सुद्धा धक्का बसला. लव्ह आजकल सिनेमाच्या प्रमोशनसाठी कार्तिक आणि सारानं नुकतीच इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावली. यावेळचा कार्तिकचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इंडियन आयडॉल मंचावर पोहोचलेल्या कार्तिक-सारा यांना होस्ट आदित्य नारायणनं एक फन गेम टास्क दिला होता ज्यात या दोघांना काही प्रश्नाची उत्तरं द्यायची होती. सिद्धार्थ शुक्लाच्या अटकेचा Video Viral, व्हॅनमध्ये बसवताना दिसले मुंबई पोलीस
यावेळी ब्रेकअप झाल्यास तुमच्या दोघांपैकी कोण चांगला मित्र राहिलं? असा प्रश्न आदित्यनं विचारला. त्यावर सारानं मी ब्रेकअपनंतरही मैत्री ठेऊ शकते असं उत्तर दिलं. पण कार्तिकनं मात्र ‘नाही’ असं उत्तर दिलं आणि सोबतच ‘आना है तो पूरी तरह आना नाही तो आना ही नही’ असा लव्ह आजकलचाच डायलॉग म्हणत स्पष्टीकरण दिलं. यावर आदित्यनं सुद्धा कार्तिकला आपलं समर्थन दिलं. पण कार्तिकचं हे उत्तर ऐकून साराला मात्र धक्का बसला. या उत्तरानंतर तिच्या चेहऱ्यावरचे भाव पटकन बदललेले दिसले. घटस्फोटानंतर अरबाज खानबद्दल मलायका अरोरा म्हणते…
साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह आज कल’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून सिनेमात बी टाऊनमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी सारा-कार्तिक पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. त्यांचा हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय सारा वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये सुद्धा दिसणार आहे. तसेच दिग्दर्शक रोहित शेट्टीनं सारा-कार्तिकच्या जोडीला चेन्नई एक्स्प्रेसच्या सिक्वेलसाठी साइन करण्याची इच्छा बोलून दाखवली. असं झाल्यास सारा-कार्तिकची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसेल. नेहा धुपियाशी लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडविषयी काय विचार करतो अंगद बेदी