आमिर खान आणि करिश्मा कपूर
मुंबई, 17 मार्च : ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाने करिश्मा कपूरच्या बुडत्या कारकिर्दीला आधार दिला नाही तर तिला रातोरात सुपरस्टार बनवलं. या चित्रपटाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. मग ती करिश्मा कपूर आणि आमिर खानचा दमदार अभिनय असो किंवा या चित्रपटातील जबरदस्त गाणी असो. हा चित्रपट आजही अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. ‘राजा हिंदुस्तानी’ हा त्या काळातील सर्वात बोल्ड चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटातील एका किसिंग सीनने इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. पण या सीन मागची गोष्ट खूपच रंजक आहे. ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूरच्या जोडीने सुमारे एक मिनिट लांब किसिंग सीन केला होता. त्या काळात बऱ्याचदा अभिनेत्रीनी असे सीन करणे टाळायच्या, पण करिश्माने एक मिनिटभर लांब किसिंग सीन देत सगळ्यांनाच थक्क केले होते. पण हे दृश्य पडद्यावर पाहायला जितकं रंजक दिसत होतं, तितकंच त्याचं चित्रीकरणही अवघड होतं. बायको आली अन् नशीब उजळलं; ‘या’ अभिनेत्यांनी लग्नानंतर घेतली बॉलिवूडमध्ये एंट्री राजीव मसंद यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत करिश्मा कपूरने या किसिंग सीनची कहाणी सांगितली होती. तिने या सीनबद्दल सांगितलं होतं कि, शूटिंगदरम्यान तिची आणि आमिर खानची प्रकृती बिघडली होती. 1 मिनिटाचा सीन शूट करण्यापूर्वी दोघेही खूप घाबरले होते. चित्रपटाचा हा प्रसिद्ध सीन फेब्रुवारी महिन्यात उटी येथे शूट करण्यात आला होता. कडाक्याच्या थंडीत हा सिन शूट करताना दोघांचीही पार वाट लागली होती. तब्बल 3 दिवसांनंतर दिग्दर्शकाला हा परफेक्ट शॉट मिळाला होता. त्यादरम्यान उटीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त थंडी पडत होती. कडाक्याची थंडी, वेगाने वाहणारा थंड वारा आणि गोठवणारे थंड पाणी अशा बिकट परिस्थिती या दोघा कलाकारांना हा सीन शूट करायचा होता. हा सीन शूट करण्यासाठी 3 दिवस लागले आणि जवळपास 47 रिटेक घ्यावे लागले. या दृश्यादरम्यान आमिर खान आणि करिश्मा कपूर दोघांनाही या सीनचे शूटिंग लवकरात लवकर संपले पाहिजे असेच वाटत होते.
तीन दिवसांच्या मेहनतीनंतर जेव्हा दिग्दर्शकाला परफेक्ट शॉट मिळाला तेव्हा आमिर आणि करिश्माच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यावेळी हे कलाकार सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत शूटिंग करायचे. करिश्मा म्हणते की त्या काळात अशा कठीण परिस्थितीत चित्रपटाचे शूटिंग करणे हा एक वेगळा अनुभव होता. या चित्रपटातील दोघांच्या या किसिंग सीनची आजदेखील चांगलीच चर्चा होते.