Cast of Brahmastra 2
मुंबई, 13 सप्टेंबर : सध्या जिकडेतिकडे फक्त ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचीच चर्चा आहे. या चित्रपटाबद्दल अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया प्रेक्षकांमध्ये उमटत आहेत. या चित्रपटाचा ‘ब्रह्मास्त्र भाग 1- शिवा’ हा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. या भागाची कथा शिवा या नायकाच्या भोवती फिरते. आता येणाऱ्या काळात दुसरा भाग प्रदर्शित होईल. पहिल्या भागात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघे प्रमुख भूमिकेत आहेत. पण आता हा चित्रपट पहिल्यांनंतर सगळ्यांमध्ये दुसऱ्या भागाविषयी उत्सुकता वाढली आहे. त्यातच आता या चित्रपटाचा निर्माता करण जोहरच्या एक जुनी इंस्टाग्राम पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टवरून चित्रपटाच्या पुढच्या भागात कोणते कलाकार असतील याचा अंदाज चाहते बांधत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शेवटी एक सस्पेन्स निर्माण करण्यात आलेला आहे. तो शेवट पुढच्या भागाची सुरुवात असणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं नाव ‘ब्रह्मास्त्र भाग 2- देव’ असं आहे. ही कथा ‘देव’ या नायकाच्या भोवती फिरणार आहे. या देवची भूमिका कोण साकारणार याबद्दल आता चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक अभिनेत्यांची नावं समोर येत असतानाच आता करण जोहरची एक जुनी पोस्ट सध्या व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग यांच्यासोबत शाहरुख खान, आमिर खान आणि करण जोहर हे सगळे एकत्र दिसतायत. करण जोहरने 2018 मध्ये आपल्या घरातील पार्टीमधील हा फोटो पोस्ट करत त्याला, “आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर!!!!!” असे कॅप्शन दिलेले आहे. यामुळे आता सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
त्यामुळे आता ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग पाहणाऱ्यांना आता याच्या दुसऱ्या भागाची ओढ लागली आहे. दुसऱ्या भागात नेमकं काय घडणार. आणि कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘ब्रह्मास्त्र पार्ट 2’ मध्ये मुख्य भूमिकेत दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण त्याबद्दल निर्मात्यांनी अजून कुठलाही खुलासा केलेला नाही. हेही वाचा - Brahmastra Box Office Collection: ब्रह्मास्त्रने 3 दिवसात तोडले ‘हे’ 5 रेकॉर्ड; साऊथमध्येही जोरदार कमाई बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, दीपिका रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकारणार आहे. कारण ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ मधील एका दृश्यात ती अस्पष्टपणे दिसून आली आहे. तसेच करणं जोहरने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये चित्रपटातील प्रमुख अभिनेत्यांमध्ये रणवीर आणि दीपिका देखील सामील आहेत. त्यामुळे या चर्चाना आता अधिकच उधाण आले आहे.