JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'The Kashmir Files' च्या प्रमोशनला कपिल शर्माने दिलेला नकार? अनुपम खेर यांनी उघड केलं सत्य

'The Kashmir Files' च्या प्रमोशनला कपिल शर्माने दिलेला नकार? अनुपम खेर यांनी उघड केलं सत्य

The Kashmir Files चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकतंच असं म्हटलं होतं की, त्यांना चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलने आपल्या शोमध्ये…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मार्च-  दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री  (Vivek Agnihotri)  यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला समीक्षकांपासून ते प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून अनेक वादविवादही निर्माण झाले आहेत. नुकतंच कॉमेडियन कपिल शर्माच्या  (Kapil Sharma) ‘द कपिल शर्मा शो’ या शोमुळेही हा चित्रपट चर्चेत आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकतंच असं म्हटलं होतं की, त्यांना चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलने आपल्या शोमध्ये आमंत्रित केलेलं नाहीय. यानंतर कपिल शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता. या गोष्टीनंतर कपिल शर्माला ट्विटरवर प्रचंड ट्रोल केलं जाऊ लागलं होतं. इतकंच नव्हे तर ‘द कपिल शर्मा शो’वर बहिष्कार टाकण्याची मागणीसुद्धा केली जात होती. अशा परिस्थितीत आता अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले असून त्यांनी यामागचं सत्य सर्वांना सांगितलं आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चे मुख्य कलाकार अनुपम खेर यांनी नुकतंच एका मुलाखतीत या संपूर्ण वादाबाबत खुलासा केला असून ‘द कपिल शर्मा शो’मध्ये चित्रपटाचे प्रमोशन न करण्यामागचे कारण उघड केले आहे.

संबंधित बातम्या

अनुपम खेर यांनी सांगितले की, ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रमोशनसाठी त्यांना कपिल शर्मा शोमधून तब्बल दोन महिन्यांपूर्वीच आमंत्रण मिळाले होते. पण, हा चित्रपट एवढ्या गंभीर विषयावर बनवला आहे की, कॉमेडी शोमध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणं त्यांना योग्य वाटलं नाही.या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत कपिल शर्माने सत्य समोर आणल्याबद्दल अनुपम खेर यांचे आभार मानले आहेत. (हे वाचा: ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमासंबंधी नितेश राणेंनी केली मुख्यामंत्र्यांना ‘ही’ विनंती ) अनुपम खेर एका मुलाखतीत म्हणाले- ‘मला शोमध्ये प्रमोशनसाठी बोलावले होते. त्यानंतर मी माझ्या मॅनेजरला सांगितले की, हा चित्रपट खूप गंभीर विषयावर आहे. मी तिथे माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करू शकत नाही.’ त्यांनी पुढं म्हटलं,- ‘मला माझं म्हणणं मांडायचं आहे. याठिकाणी प्रमोशनसाठी मला 2 महिन्यांपूर्वीच फोन आला होता. मी त्या शोमध्ये 2-4 वेळा गेलो आहे आणि तो एक कॉमेडी शो आहे आणि एका कॉमेडी शोमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन करणं खूप कठीण आहे’. असं म्हणत अनुपम खेर यांनी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या