JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कंगना विरोधात शिजतंय आंतरराष्ट्रीय षडयंत्र? अभिनेत्रीची अजब पोस्ट व्हायरल

कंगना विरोधात शिजतंय आंतरराष्ट्रीय षडयंत्र? अभिनेत्रीची अजब पोस्ट व्हायरल

कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. जगभरातील राजकिय घडामोडिंवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 ऑगस्ट**:** अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान राजवट परतली आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबूल ताब्यात घेतली आहे. (afghanistan crisis) तसंच तेथील अध्यक्षांच्या घरावरही त्यांचा झेंडा फडकावला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देत अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने आपला संताप व्यक्त केला होता. मात्र त्यानंतर तिचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं असा दावा तिने केला आहे. कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. जगभरातील राजकिय घडामोडिंवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते. यामुळे अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी तिचं इन्स्टाग्राम अकाउंटच हॅक झालं. तिने “काल रात्री मला इन्स्टाग्रामवर अलर्ट मिळाला की चीनमधील कोणीतरी माझं खातं हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. नोटिफिकेशन देखील अचानक गायब झालं आणि आज सकाळी मी पाहिले की तालिबानवर लिहिलेल्या माझ्या सर्व पोस्ट गायब झाल्या. माझं इन्स्टाग्राम अकाउंट बंद झालं होतं.” अशा आशयाची पोस्ट लिहून अकाउंट हॅक झाल्यामी माहिती आपल्या चाहत्यांना दिली. ‘देवमाणूस’चा भाग 2 येणार? मालिकेच्या सक्सेस पार्टीनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता अभिनेत्री कंगना रणौतने दावा केलाय की, तिचं इन्स्टाग्राम अकाउंट भारत नव्हे तर चीनमधून हॅक करण्याचा प्रयत्न केलाय. हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचं देखील तिने या स्टोरीमध्ये म्हटलंय. कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. तिचे अनेक फॅन्स या पोस्टवर कमेंट्स करताना दिसून येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या