मुंबई, 11 मार्च- बाहुबली स्टार (Bahubali Star) प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडेचा (Pooja Hegade) बहुचर्चित ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) 11 मार्च अर्थातच आज रिलीज झाला आहे. चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. हैदराबादमध्ये पहिल्याच दिवशी पहिल्या शोचे आगाऊ बुकिंग हाऊसफुल्ल झाले होते. प्रभासच्या या चित्रपटाबद्दल असा दावा केला जात होता की तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल. असंच काहीसं चित्रपट पाहिल्यानंतर समीक्षक कमाल आर खानही म्हणत आहे. नेहमीच सर्व चित्रपटांची खिल्ली उडवणाऱ्या KRK ने यावेळी मात्र प्रभासच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शिक राधा कृष्ण कुमार यांच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटाचे ज्या पद्धतीने अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. त्यावरून हा चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कमाल आर खान म्हणजेच KRK ने ही चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर रिव्ह्यू दिला आहे. चित्रपटातील कलाकार प्रभास आणि पूजा हेगडे यांच्यासोबत कमालने दिग्दर्शकाचेही कौतुक केले आहे. कमाल आर खान नेहमीच नकारात्मक प्रतिक्रिया देत असतो. पण प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाबाबत त्याचा सूर बदलला आहे. चित्रपटाचं विश्लेषण करण्याची केआरकेची स्वतःची शैली आहे. ‘राधे श्याम’ पाहिल्यानंतर केआरकेने ट्विटरवर चित्रपटाच्या दिग्दर्शकाला हुशार असं म्हटलं आहे. आणि चांगले काम केल्याचंही कबुल केलं आहे. केआरकेने ट्विट करत लिहिलं, ‘राधे श्यामचा फर्स्ट हाफ जबरदस्त आहे. दिग्दर्शकाने उत्तम काम केले आहे. पूजा हेगडे आणि प्रभास यांनी अप्रतिम काम केले आहे. मला आशा आहे की चित्रपटाचा दुसरा हाफ देखील उत्कृष्ट असेल. नेहमी नकारात्मक प्रतिक्रिया देण्यात एक्सपर्ट असलेल्या केआरकेने पुढील ट्विटमध्ये सांगितले की, त्यांना चित्रपटाचा सेकंड हाफ कसा वाटला. याबद्दल सांगताना याने लिहिलंय, ‘सेकंड हाफ पहिल्या हाफइतका चांगला नसला , तरीही राधे श्याम चांगला चित्रपट आहे. हा चित्रपट हिट होणार आहे. याचे संपूर्ण श्रेय दिग्दर्शकाला जाते.