JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सेक्रेड गेम्सची अभिनेत्री लग्नाआधीच आहे प्रेग्नंट, Water Birth द्वारे बाळाला देणार जन्म

सेक्रेड गेम्सची अभिनेत्री लग्नाआधीच आहे प्रेग्नंट, Water Birth द्वारे बाळाला देणार जन्म

कल्की कोचलिननं 2011मध्ये बॉलिवूड फिल्ममेकर अनुराग कश्यपशी लग्न केलं होतं मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 2015 मध्ये घटस्फोट घेत हे दोघंही वेगळे झाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 सप्टेंबर : अभिनेत्री कल्की  कोचलिन सध्या बॉलिवूड सिनेमांपासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सेक्रेड गेम्समध्ये तिनं बत्याची भूमिका साकारली आहे. मात्र त्यानंतर तिनं कोणताही नवा प्रोजेक्ट स्वीकरलेला नाही. मात्र आता तिनं नवा प्रोजेक्ट न स्वीकारण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. कल्की पाच महिन्यांची प्रेग्नंट असून शरीरात होत असलेल्या वेगवेगळ्या बदलांमुळे ती पूर्वीप्रमाणे काम करू शकत नसल्याचं कल्कीनं सांगितलं. अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर कल्की कोचलिन मागच्या काही काळापासून इस्रायली पियानो वादक Guy Hershberg शी रिलेशनशिपमध्ये आहे. हिंदुस्तान टाइम्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कल्की 5 महिन्यांची प्रेग्नंट असून ती वॉटर बर्थ पद्धतीनं तिच्या बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री ब्रुना अब्दुल्लाह हिनं सुद्धा या पद्धतीचा वापर करत बाळाला जन्म दिला होता आणि तिचा हा अनुभव तिनं सोशल मीडियाद्वारे सर्वांशी शेअर केला होता. आमिरच्या ‘या’ हिरोईनवर अभिनेता इम्रान खानचा जडला होता जीव, मुलाखतीत केला खुलासा

आपल्या प्रेग्नन्सी विषयी बोलतना कल्की सांगते, ‘मातृत्वाच्या वेळी शरीरात आणि आयुष्यात होणारे बदल मला सुरुवातीपासूनच जाणवत आहे. मी पूर्वीपेक्षा स्वतःची जास्त काळजी घ्यायला लागले आहे. माझ्या हालचालींमध्ये थोडासा संथपणा आला आहे. मात्र आता मी पूर्वीपेक्षा जास्त धैर्यवान झाल्याचं मला वाटतं. जेव्हा मातृत्व येतं तेव्हा आपसूकच तुमच्या शरीरात नवचैतन्य येतं.’ VIDEO : केवढं ते प्रेम! आलिया भट्ट किचनमध्ये स्वतः करतेय रणबीरचा आवडता केक

ती पुढे म्हणाली, ‘मला अजूनही काम करायचं आहे पण कामच्या शर्यतीपेक्षा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या शरीरात असंख्य बदल होत असल्याचं मला जाणवत आहे.’ दरम्यान, कल्की कोचलिननं 2011मध्ये बॉलिवूड फिल्म मेकर अनुराग कश्यपशी लग्न केलं होतं मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 2015 मध्ये घटस्फोट घेत हे दोघंही वेगळे झाले. रानू मंडलनी उदित नारायण यांच्यासोबत रेकॉर्ड केलं नवं गाणं, पाहा EXCLUSIVE VIDEO =========================================================== Navratri 2019: कोल्हापुराच्या अंबाबाईचं पहिलं दर्शन, पाहा LIVE VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या