JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kajol: 'अशिक्षित नेते आपल्यावर राज्य...' भारतातील राजकारणाविषयी काजोलचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Kajol: 'अशिक्षित नेते आपल्यावर राज्य...' भारतातील राजकारणाविषयी काजोलचं 'ते' वक्तव्य चर्चेत

द ट्रायलच्या प्रमोशन करताना एका मुलाखतीदरम्यान, काजोलने मोठं वक्तव्य केलं आहे.

जाहिरात

काजोल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जुलै :  सध्या बॉलिवूडमध्ये काजोलचा बोलबाला आहे. अभिनेत्री सध्या चित्रपटसृष्टीत चांगलीच सक्रिय झाली असून तिचे चित्रपट आणि वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तिच्या कामाला चाहते उत्तम प्रतिसाद देखील देतात. एवढंच नाही तर काजोल सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे. नुकतीच ती लस्ट स्टोरी मध्ये झळकली होती. तिच्या या चित्रपटातील भूमिकेचं सगळीकडेच कौतुक होत आहे. काजोल येणाऱ्या काळात ‘ट्रायल-प्यार, कानुन, धोका’ ’ या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. या वेब सिरीजमध्ये ती एका वकिलाची भूमिका साकारणार आहे. अशातच आता काजोलने भारतातील राजकारण्यांविषयी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. काजोलची लोकप्रिय वेब सिरीज ‘द ट्रायल’ 14 जुलै 2023 रोजी रिलीज होणार आहे. ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  ‘ट्रायल’ ही वेब सिरीज अमेरिकन  मालिका ‘द गुड वाईफ’चा हिंदी रिमेक आहे. काजोलशिवाय ‘द ट्रायल’मध्ये जिशू सेनगुप्ता, एली खान, शीबा चड्ढा आणि कुब्बरा सैत यांच्याही भूमिका आहेत. द ट्रायलच्या प्रमोशन करताना एका मुलाखतीदरम्यान, काजोलने मोठं वक्तव्य केलं आहे.

क्विंट’ ला दिलेल्या या मुलाखतीत काजोलने मोठं वक्तव्य केलं आहे. ट्रायल ही वेबसिरीज महिला सक्षमीकरणाबद्दल आहे. याला  स्वतःच्या आयुष्याशी जोडत काजोलने तिच्या दमदार कमबॅक वर भाष्य केलं. ती म्हणाली की, ‘मी  कमबॅकवर विश्वास ठेवत नाही. मी दोन वर्षे काम केलं नाही याचा अर्थ असा नाही की त्या काळात मी काहीच करत नव्हते. घरी बसून राहण्यापेक्षा घराबाहेर पडून काम करण्यातच मला जास्त आनंद होतो.’ ती पुढे म्हणाली की, ‘‘स्त्री सक्षमीकरणातील सर्वात मोठी हानी म्हणजे स्वतः स्त्रिया आणि महिला म्हणून आपण मुले निर्माण करतो आणि पण आपणच एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहत नाही. आपण आपल्या मुलांना असं वाढवायला पाहिजे की ते समाजातील विविध मतांचा आदर करतील.’’ Manoj Muntashir: अखेर आदिपुरुष’च्या लेखकांनी हात जोडून मागितली माफी; नेटकरी म्हणाले ‘तुम्ही संधीसाधू…’ या मुलाखतीत  जेव्हा भारतामध्ये महिला सशक्तीकरणाशी संबंधित गोष्टी कशा घडतात याबद्दल चर्चा झाली तेव्हा काजोलने एक वादग्रस्त विधान केलं. काजोल म्हणाली, ‘‘याचा संबंध शिक्षणाशी आहे. आपल्याकडे अशिक्षित राजकारणी ज्यांना विकास कसा करायचा ते माहित नसतं असे लोक आपल्यावर राज्य करतात. ’’ आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी अभिनेत्रीला ट्रोल करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

काजोल पुढे म्हणाली, “भारतासारख्या देशात बदल खूप मंदपणे होत आहे. आपण आपल्या परंपरा आणि विचारप्रक्रियेत अडकलो आहोत आणि त्याचा संबंध शिक्षणाशी आहे. आपल्यावर असे राजकीय नेते राज्य करतात ज्यांना काहीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. माझ्या मते शिक्षणामुळे तुम्हाला कमीत कमी वेगळ्या दृष्टिकोनातुन पाहण्याची संधी मिळते,” असं मत तिने व्यक्त केलं आहे. तिच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेटकरी तिला “काजोल तूच अभिनयासाठी शिक्षण सोडून दिलंस आणि आता अशिक्षित राजकारण्याविषयी बोलतेस’ असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या