JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kajol : 'न्यासा माझ्यापेक्षा सभ्य आहे'; काजोलने बांधले लेकीच्या कौतुकाचे बंगले

Kajol : 'न्यासा माझ्यापेक्षा सभ्य आहे'; काजोलने बांधले लेकीच्या कौतुकाचे बंगले

काजोलनं पापाराझींबरोबरचा न्यासाचा एक अनुभव देखील सांगितला. त्याचप्रमाणे एक वक्तव्य केलं ज्यानं सगळ्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्यात.

जाहिरात

काजोल आणि न्यासा देवगण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 जुलै: अभिनेत्री काजोल सध्या तिच्या द ट्रायल या आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे तिची लस्ट स्टोरीज ही वेब सीरिजही प्रदर्शित झाली आहे. काजोल आणि तिची आई अभिनेत्री तनूजा यांच्यात फार जवळचं नातं आहे. नुकत्याच एक मुलाखतीत काजोलनं तिच्यामध्ये आईमध्ये असलेल्या मैत्रीविषयी भाष्य केलं. काजोल आणि तनूजा यांचं एकमेकींबरोबर जसं नात आहे तसंच नात काजोल आणि न्यासा देवगण यांच्यात असल्याचं काजोलनं सांगितलं.  तनूजा यांनी नेहमीच काजोलला तिच्या चुकांमधून शिकण्याची संधी दिली आहे. याच प्रयोग आता काजोल देखील तिच्या मुलीबाबत करताना दिसतेय. काजोलनं पापाराझींबरोबरचा न्यासाचा एक अनुभव देखील सांगितला. त्याचप्रमाणे एक वक्तव्य केलं ज्यानं सगळ्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्यात. काजोलची मुलगी न्यासा देवगण नेहमीच तिच्या वागणूकीमुळे आणि कपड्यांमुळे चर्चेत असते. न्यासा कुठेही गेली तरी पापाराझी तिच्या मागे असतात. न्यासा पापाराझींबरोबर चांगलं डिल करून तिथून बाहेर पडते. पापाराझींना हँडल करण तिला व्यवस्थित जमतं असं काजोलनं सांगितलं.  याबरोबर काजोलनं काही वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगत न्यासा पापाराझींना सहज हँडल का करते याचा एक अनुभव सांगितला. हेही वाचा -  Pratibha Sinha Birthday : आता कुठे आहे परदेसी-परदेसी गर्ल; आमिर खानबरोबर केला होता रोमान्स काजोल म्हणाली,  आम्ही पहिल्यांदा जयपुरला गेलो होतो. तेव्हा आम्हाला पापाराझींचा अनुभव आला. आम्ही दोघी एकट्या होतो आणि आमच्याबरोबर कोणतीही सिक्युरिटी नव्हतं. तेव्हा फोटोग्राफर्सनी आम्हाला घेरलं आणि ते फोटोसाठी ओरडू लागले. आम्ही दोघीही घाबरलो आणि न्यासा रडायला लागली. मी तिला कडेवर घेतलं आणि थेट गाडीत जाऊन बसले. त्यानंतर मी न्यासाला समजावून सांगितलं की ते त्यांचं काम असतं.

संबंधित बातम्या

काजोल पुढे म्हणाली, अशी परिस्थिती सभ्यता आणि सन्मानाने हातळण्यासाठी न्यासा सक्षम आहे. तिला अशी परिस्थिती उत्तमरित्या सांभाळते. माझ्यापेक्षा अधिक सभ्यता आणि सन्मानाने ती अशी परिस्थिती हाताळते. तिच्या जाही मी असते तर आतापर्यंत कधीच माझी चप्पल बाहेर आली असती.

आईविषयी बोलताना काजोल म्हणाली, आईने नेहमीच माझी बाजू घेतली. तुमच्या आजूबाजूला तुमची काळजी घेणारी, तुमचं पालन -पोषण करणारी व्यक्ती असणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आई लहानपणापासून मला हेच सांगत आली आहे की, तुम्ही जे काह कराल त्यात मी तुमच्या पाठीशी असेन. तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पश्चाताप होण्यापेक्षा तुम्ही वेळीच योग्य निर्मण घ्या, असं ती आम्हाला सांगत आल ी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या