JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kajol : 'आयुष्यातील कठीण काळ' म्हणत काजोलने का घेतली सोशल मीडियावरून एक्झिट? खरं कारण आलं समोर

Kajol : 'आयुष्यातील कठीण काळ' म्हणत काजोलने का घेतली सोशल मीडियावरून एक्झिट? खरं कारण आलं समोर

काजोलनं तिच्या इन्ट्ग्रामवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या असून सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत होते. मात्र तिच्या या कृतीमागचं कारण आता समोर आलं आहे.

जाहिरात

काजोल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जून: बॉलिवूड अभिनेत्री काजोल चित्रपटसृष्टीत चांगलीच सक्रिय आहे. नवऱ्याप्रमाणे ही अभिनेत्री सुद्धा एकापाठोपाठ एक चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये झळकत आहे. तिच्या कामाला चाहते उत्तम प्रतिसाद देखील देतात. एवढंच नाही तर काजोल सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे. तिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. काल काजोलनं सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनं तिच्या चाहत्यांना चिंतेत पाडलं. काजोलनं सोशल मीडियाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला होता.  काजोलनं तिच्या इन्ट्ग्रामवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या असून सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं.  त्यामुळे तिचे चाहते चिंतेत होते. मात्र तिच्या या कृतीमागचं कारण आता समोर आलं आहे. काजोलने शुक्रवारी सकाळी ‘माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण परिक्षेचा सामना करत आहे’ अशी पोस्ट करत  ‘मी सोशल मीडियातून ब्रेक घेत आहे,’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. तिच्या या घोषणेनंतर तिच्या चाहत्यांना चिंता आणि धक्का बसला. काजोलने असं का केलं याविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. पण आता काजोलने असे करण्यामागचे कारण समोर आले आहे.

काजोल येणाऱ्या काळात ‘ट्रायल’ या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. त्यामुळे इंस्टाग्राम पोस्ट डिलीट करणं हा फक्त एक प्रसिद्धी स्टंट होता. अभिनेत्रीने आता द ट्रायल नावाच्या तिच्या पहिल्या वेब सीरिजचा पहिला लूक रिलीज केला आहे. संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर करत काजोलने लिहिले की, ‘जेवढी कठीण परिक्षा, तितकेच कठीण तुम्ही परत याल. ओटीटीवर तिची ‘द ट्रायल-प्यार, कानुन, धोका’ नावाची वेबसीरिज येत आहे. याच सीरिजचा ट्रेलर १२ जूनला प्रदर्शित होणार आहे. एक व्हिडीओ शेअर करत तिने याबाबत घोषणा केली. या सीरिजच्या प्रमोशनसाठीच काजोलने हा नवा स्टंट केला. Mika Singh birthday : आलिशान बंगला, महागड्या गाड्यांचा मालक आहे कॉन्ट्रोवर्सी किंग मिका सिंग; नेटवर्थ माहितीये? काजोलची पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते चिंता व्यक्त करत होते. अनेकांनी कमेंट्समधून काजोलला काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. पण आता या मार्केटिंग नौटंकीसाठी नेटकऱ्यांनी काजोलला फटकारलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेक नकारात्मक कमेंट्स करण्यात येत आहेत. यापुढे तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही, हा स्टंट योग्य नाही, थोडीतरी लाज बाळग, अशाप्रकारे प्रमोशन करणं योग्य नाही अशा अनेक कमेंट काजोलच्या नव्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या

काजोलसाठी ‘ट्रायल’ हे ओटीटी डेब्यू नाही कारण ती यापूर्वी 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर रेणुका शहाणेच्या ‘त्रिभंगा’ या चित्रपटात दिसली होती.  ‘ट्रायल’ ही वेब सिरीज अमेरिकन  मालिका ‘द गुड वाईफ’चा हिंदी रिमेक आहे. काजोलशिवाय ‘द ट्रायल’मध्ये जिशू सेनगुप्ता, एली खान, शीबा चड्ढा आणि कुब्बरा सैत यांच्याही भूमिका आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या