झलक दिखला जा 10
मुंबई, 25 नोव्हेंबर : कलर्स टीव्हीचा धमाकेदार डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ हळूहळू ग्रँड फिनालेकडे वाटचाल करत आहे. विशेष म्हणजे २६ नोव्हेंबरला या शोचा फिनाले होणार आहे, ज्यामध्ये रुबिना दिलैक, गश्मीर महाजनी, फैसल शेख, गुंजन सिन्हा, निशांत भट्ट आणि सृती झा एकमेकांना टक्कर देताना दिसणार आहेत. पण फिनालेपूर्वी ‘झलक दिखला जा 10’ च्या विजेत्याचे नाव समोर आले आहे. प्रेक्षक या विजेत्याचं नाव ऐकून मात्र फारसे खुश दिसत नाहीये.आता या विजेत्या स्पर्धकाचं नाव ऐकून सोशल मीडियावर ‘बॉयकॉट झलक दिखला जा 10’ हा ट्रेंड सुरू झाला आहे. टीव्हीच्या धमाकेदार डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे की, रुबिना दिलैक आणि फैसल शेख किंवा गश्मीर महाजनी किंवा निशांत भट्ट या शोचे विजेते झाले नाहीत. ‘झलक दिखला जा 10’ ची ट्रॉफी जिंकणाऱ्या स्पर्धकाचे नाव आहे गुंजन सिन्हा. गुंजन सिन्हा आणि तेजस वर्मा या शोचे विजेते ठरले आहेत तर गश्मीर महाजनी आणि रुबिना डिलाईकसह इतर स्टार्सना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले आहे.‘द खबरी’या पेजने गुंजन सिन्हा या शोची विजेती झाल्याचे ट्विट केले आहे. हेही वाचा - Richa Chadha: ‘कलाकार म्हणजे शांती दूत…’ जेव्हा रिचाने केली होती पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण पण गुंजन सिन्हा ‘झलक दिखला जा 10’ ची विजेती ठरल्यावर प्रेक्षक मात्र नाराज झाले. एका यूजरने ट्विट केले की, “काही लोक म्हणत आहेत की गुंजन एक चांगली डान्सर आहे म्हणूनच तिने हा शो जिंकला. मग आमच्या मतदान करण्याला काय अर्थ आहे. त्यांनी पुन्हा शोमधून मतदान ठेवूच नये.” तर दुसर्या यूजरने लिहिले की, “जर रुबिना झलकची विजेती होणार नसेल तर आम्ही झलक बघणारच नाही.‘‘तर काही प्रेक्षकांनी हा शो आता आम्ही बघणार नाही असे ट्विट केले आहे.
निक्की तांबोळीने रुबिना आणि सनम जोहर यांच्याबद्दल एक इंस्टाग्राम स्टोरी देखील शेअर केली, ज्यामुळे देखील चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. रुबीना आणि सनमचा फोटो शेअर करत निकीने लिहिले, “सीझनमधील सर्वात आवडते स्पर्धक रुबिना दिलीक आणि सनम जोहर, माझे प्रेम नेहमीच तुमच्यासाठी असेल. तुम्ही प्रत्येक परफॉर्मन्सला थक्क केले. तुम्ही कदाचित शो जिंकला नाही तरी पण तुम्ही करोडो लोकांची मने जिंकत आहेत. त्यानंतर रुबिना इजेती झाली नाही यावर शिक्कामोर्तबच झाले.
‘झलक दिखला जा 10’ मधुन मराठमोळ्या अमृताला निरोप घ्यावा लागला तेव्हाही प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला होता. विजेते पदाची दावेदार असलेल्या अमृताला शो मधून बाहेर काढल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच गश्मीर महाजनींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात चाहते होते. आता गूंजनने विजेतेपद जिंकल्यावर प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत.