रितेश-जेनेलियाचं 'वेड'; टिझर आउट

जेनेलिया आणि रितेश देशमुख आज बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून ओळखले जातात.

कायमच ते सोशल मीडियावर सक्रिय असलेले पहायला मिळतात.

जेनेलियानं 2003 मधे 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं.

या चित्रपटात जेनेलियासोबत अभिनेता रितेश देशमुखनं मुख्य भूमिका साकारली होती.

दोघांनी बऱ्याच चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.

आता दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.

जेनेलिया आणि रितेश लवकरच 'वेड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

आज त्यांच्या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.

आज 'वेड'चा टिझर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक या दोघांना पुन्हा एकत्र पाहायला उत्सुक आहेत.