javed akhtar
मुंबई, 21 फेब्रुवारी : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर नुकतेच लाहोरमध्ये झालेल्या एका फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. तिथला त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात त्यांनी मुंबईत झालेल्या 26\11च्या हल्ल्यावरून पाकिस्तानवर चांगलाच निशाणा साधला आहे. दहशतवादी आजही तुमच्या देशात फिरत असल्याचं त्यांनी म्हटलं. लाहोरमध्ये उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मृर्तिप्रीत्यर्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा लाखो भारतीयांच्या मनातील गोष्ट जावेद अख्तर यांनी बोलून दाखवली. 26\11च्या हल्ल्यातील खदखद त्यांनी व्यक्त करून दाखवली. सध्या जावेद अख्तर यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जावेद अख्तर यांनी म्हटलंय, ‘आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं पाहिजे. एकमेकांना दोष देऊन कोणत्याही समस्या सुटणार नाही. सध्या जे वातावरण तापलं आहे ते कमी व्हायला पाहिजे. आम्ही बॉम्बेचे लोक आहोत. 26\11चा हल्ला कसा झाला ते आम्ही पाहिलं आहे. ते लोक ना नॉर्वेतून आले होते, ना इजिप्तमधून. ते अजूनही तुमच्या देशात फिरत आहेत’. हेही वाचा - शक्ती कपूर ते विवेक ओबेरॉय; एका चूकीनं या प्रसिद्ध सेलेब्सचं करिअर केलं फ्लॉप
जावेद अख्तर यांनी पुढे आणखी एक खदखद बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘आम्ही भारतात मेहंदी हसन, नुसरत फतेही अली खान सारख्या पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करतो. पण तुमच्या पाकिस्तानात आजवर कधीच लता मंगेशकर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही’.
जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री कंगना रणौतनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. ऐरवी जावेद अख्तरच्या विरोधात बोलणारी कंगना यावेळी मात्र त्यांच्या बाजूने बोलताना दिसली. कंगनानं म्हटलंय, ‘मी जेव्हा जावेद साहेबांची शायरी ऐकते तेव्हा मला नेहमी वाटतं की स्वरसतींची त्यांच्यांवर किती कृपा आहे. पण बघा माणसात काही तरी सत्य आहे. जय हिंद जावेद अख्तर साहेब… घरात घुसून मारलं… हा…हा’