मुंबई, 22 मे- सध्या टीआरपीच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी मालिकेत दररोज नवीन ट्वीस्ट पाहायला मिळतात. प्रेक्षकांची मालिकेबद्दल उत्सुकता वाढावी म्हणून मालिकेत लोकप्रिय कलाकरांची पाहुणा कलाकार म्हणून एंट्री होताना दिसते. असाच एक ट्रॅक जाऊ नको दूर बाबा ( jau nako dur baba ) या मालिकेत पहायला मिळणार आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान (tejashri pradhan ) लवकरच या मालिकेत दिसणार आहे. याचा प्रोमो देखील समोर आला आहे. तेजश्री प्रधान टीव्ही विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तेजश्री लवकरच या मालिकेत एक नव्या भूमिकेत दिसणार आहेत. तेजश्रीला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तेजश्री जाऊ नको दूर बाबा या मालिकेत दिसणार आहे. तेजश्रीची एंट्री असलेला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. वाचा- कनिका कपूरने 25 वर्षांचं दुःख विसरुन 43 व्या वर्षी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ जाऊ नको दूर बाबा ही मालिका सध्या खूपच रंजक प्रसंगांमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे. प्रिया, अर्पिता आणि युवराज यांच्या नात्यात सध्या जो काही गोंधळ सुरू आहे त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्ग वाढला आहे. खरं तर युवराज आणि अर्पिता यांचं एकमेकांवर प्रेम असताना अर्पिताचे बाबा प्रिया आणि युवराजचं लग्न ठरवण्यासाठी पुढाकार घेतात. अर्पिताला तिच्या बाबांच्या विरोधात जाऊन काहीच करायचं नसल्याने ती तिच्या प्रेमाचा त्याग करायचं ठरवते. आणि प्रियासोबत युवराजचं नातं स्वीकारायला तयार होते. वाचा- जय भानुशाली-माही विजच्या अडीच वर्षाच्या लेकीला मिळाली मालिकेची ऑफर, पण… मालिकेत हे सगळं सुरू असतातनाच तेजश्री प्रधानची एंट्री होणार आहे. युवराज आणि प्रियाच्या लग्नाच्या संगीत सोहळ्यात तेजश्री आणि पुष्कर जोग हजेरी लावतात असे दाखवण्यात आले आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये तेजश्रीची नेमकी भूमिका किंवा तिचे पात्र काय आहे हे याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाहबी. पण यामध्ये तेजश्री अर्पिताला तिच्या आणि युवराजच्या प्रेमाची जाणीव करून देते असं दाखवलं आहे.
पुष्कर आणि युवराज यांच्या संवादातही युवराजला प्रियासोबतच्या नात्याचा आनंद झालेला दिसत नाही असं पुष्कर सांगताना दिसत आहे. त्यामुळे तेजश्रीची एंट्री ही अर्पिता आणि युवराज यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी होणार हे तर पक्कं आहे. आता पुढं काय होणार याचा उलगडा मालिकेच्या येणाऱ्या भागातच होणार आहे.