JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Jacqueline Fernandez: 'त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त…' सुकेशविरोधात जॅकलिन फर्नांडिसचा मोठा खुलासा

Jacqueline Fernandez: 'त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त…' सुकेशविरोधात जॅकलिन फर्नांडिसचा मोठा खुलासा

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सुकेशशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल अखेर मौन सोडत त्याच्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

जाहिरात

जॅकलिन फर्नांडिस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे २०० कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरण आता वेगळंच वळण घेऊ लागलं आहे. अलीकडेच जॅकलीनने गँगस्टर सुकेश चंद्रशेखर विरोधात पटियाला कोर्टात जबाब नोंदवला आहे. यावेळी अभिनेत्री म्हणाली की, सुकेशने तिच्या भावनांशी खेळून तिचं करिअर आणि खासगी आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त केलं. याबरोबरच तिला सुकेशचं खरं नावसुद्धा माहीत नसल्याचं जॅकलिनने स्पष्ट केलं. गेले काही महीने हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. आता या प्रकरणात जॅकलिनने तिचा जबाब नोंदवला आहे. सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अनेक महिन्यांपासून अडचणीत आली आहे. तिच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. या प्रकरणी जॅकलिनने यापूर्वीही वक्तव्ये केली होती आणि आता पुन्हा एकदा तिला कोर्टात जावे लागले आहे. अलीकडेच जॅकलीनने गँगस्टर सुकेश चंद्रशेखर विरोधात पटियाला कोर्टात जबाब नोंदवला आहे. यावेळी अभिनेत्री म्हणाली की, सुकेशने तिच्या भावनांशी खेळून तिचं करिअर आणि खासगी आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त केलं. याबरोबरच तिला सुकेशचं खरं नावसुद्धा माहीत नसल्याचं जॅकलिनने स्पष्ट केलं. गेले काही महीने हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. हेही वाचा - Singham Again: आता होणार राडा! अजय देवगणच्या ‘सिंघम’मध्ये ‘सूर्यवंशी’ घेणार एंट्री जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात नुकतंच पटियाला कोर्टात हजर केलं होतं. यादरम्यान तिने न्यायालयासमोर आपली बाजू मांडत अनेक खुलासे केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलिनने दावा केला की, सुकेश चंद्रशेखर हा सरकारी अधिकारी असल्याबद्दल तिला माहिती होती. शिवाय पिंकी इराणीने तिच्या मेकअप आर्टिस्टला हेदेखील पटवून दिले की ती गृह मंत्रालयातील अधिकारी आहे. इतकंच नव्हे तर सुकेशने स्वत:ला सन टीव्हीचा मालक आणि जे जयललिता ही त्याची मावशी असल्याचंही सांगितलं होतं. याशिवाय त्याने जॅकलिनला ‘तो तिचा खूप मोठा चाहता आहे आणि  तिने साऊथ चित्रपटसृष्टीत देखील काम करावं, सन टीव्हीचे मालक म्हणून माझ्याकडे अनेक प्रकल्प आहेत. तू साऊथ चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’ असं सांगितलं होतं. या प्रकरणाबद्दल आणि सुकेशशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल बोलताना जॅकलिन म्हणाली, ‘‘त्याने मला फसवलं माझी दिशाभूल केली.  आणि माझं करिअर उद्ध्वस्त केलं. तो माझा खूप मोठा फॅन आहे आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्याला तिच्याबरोबर काम करायचं आहे असं त्याने मला सांगितलं होतं. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा आम्ही फोन आणि व्हिडिओ कॉलवर बोलायचो. पण तो जेलमधून मला फोन करायचा याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.’’

तसेच सुकेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी कळल्यानंतरही पिंकीने तिला सांगितले नाही, असेही जॅकलिन म्हणाली. न्यायालयाने 16 जानेवारी रोजी जॅकलिनने व्यावसायिक कामासाठी दुबईला जाण्याची परवानगी मागणाऱ्या अर्जावर अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली होती. त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी ठेवली आहे. जॅकलीनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बहरीनमधील तिच्या आजारी आईला भेटण्यासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, न्यायालय तिला परदेशात जाण्याची परवानगी देण्यास तयार नसल्याने तिने ते मागे घेतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या