JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Jacqueline Fernandez: वाढदिवस साजरा करण्यासाठी जॅकलिन थेट पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला; Video व्हायरल

Jacqueline Fernandez: वाढदिवस साजरा करण्यासाठी जॅकलिन थेट पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला; Video व्हायरल

बॉलिवूडच्या अभिनेत्रीचा वाढदिवस म्हणजे मोठमोठ्या कलाकारांना घेऊन पार्टी आणि मजा मस्ती करणे असते. पण जॅकलिनने आज अतिशय वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे.

जाहिरात

Jacqueline Fernandez

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत.  ती तिच्या हॉट  लुक्समुळे  तर चर्चेत असतेच पण काही दिवसांपासून ही  अभिनेत्री वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आज तिच्या वाढदिवशी मूळची श्रीलंकेची असलेल्या जॅकलिनने  काही काळातच बॉलिवूड मध्ये जम बसवला आणि नाव कमावले. आज आज 11ऑगस्ट रोजी जॅकलिन  फर्नांडिसचा वाढदिवस आहे.  बॉलिवूडच्या अभिनेत्रीचा वाढदिवस म्हणजे मोठमोठ्या कलाकारांना घेऊन पार्टी आणि मजा मस्ती करणे असते. पण जॅकलिनने आज अतिशय वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे. जॅकलिन सध्या आसाम मध्ये आहे. तिथेच तिने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. आज जॅकलिनने वाढदिवसादिवशी  आसामच्या गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले. तिने पहिल्यांदाच या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले आहे.  ‘या मंदिरात दर्शन घेण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत दैवी होता, मला आज या देवीचं दर्शन घेऊन खूप छान  वाटत आहे’  असे तिने म्हटले आहे. जॅकलिनने तिचा वाढदिवस अशा वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला पाहून तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का बसला आहे. तिला पाहण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कामाख्या देवी मंदिरात चाहत्यांची गर्दी जमली होती. हेही वाचा - Tiger Shroff : दिशानंतर टायगर श्रॉफ ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिने अजून एक खास गोष्ट केली आहे. तिने या वर्षीचा वाढदिवस अत्यन्त सध्या पद्धतीने साजरा केलेला दिसून आला. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती एका गोशाळेत असलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये बर्थडे गर्ल गायीसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

तिने इंस्टाग्रामवर हा  व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत, ‘‘हे माझ्या वाढदिवस घालवण्यासाठी  सर्वात आनंदाचे ठिकाण आहे, आज येथे घालवलेले क्षण कायम माझ्या लक्षात राहतील. माझ्या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे आभार’’ असा कॅप्शन दिला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जॅकलिन २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे समोर आले होते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुकेशने जॅकलिनला काही महागडे गिफ्ट्स देखील दिले होते. जॅकलिनच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाले तर जॅकलिन लवकरच अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या